Join us

रकुल प्रीत सिंह अन् जॅकी भगनानी यावर्षी लग्नगाठ बांधणार, डेस्टिनेशन वेडिंग अन् बरंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:02 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंहने गुडन्यूज दिली आहे.

नवीन वर्षाला उत्साहात सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी अनेक कलाकारांनी लग्नबंधनात अडकत चाहत्यांना सरप्राईज केले. यंदाच्या वर्षीही अनेक सेलिब्रिटींच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. त्यापैकीच एक बॉलिवूडमधील लाडकं कपल रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jacky Bhagnani). दोघंही यावर्षी लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या दोघंही थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंहने गुडन्यूज दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी पुढील महिन्यात २२ फेब्रुवारी 2024 रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. अद्याप कपलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, जॅकी आणि रकुल गोवा येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. गोव्याच्या zeroed मध्ये ते सातफेरे घेतील. इन्स्टाग्रामवर रकुल प्रीत सिंहने फोटो शेअर केले आहेत. मोनोबिकीनीत ती अतिशय सुंदर दिसत आहे.

जॅकी आणि रकुल प्रीत सिंहच्या लव्हस्टोरीची सुरुवात लॉकडाऊनमध्ये झाली होती. म्युच्युअल फ्रेंड्सच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले होते. तिथूनच त्यांच्या मैत्री आणि नंतर प्रेमाला सुरुवात झाली. 2021 मध्ये जॅकी आणि रकुलने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :जॅकी भगनानीरकुल प्रीत सिंगबॉलिवूडलग्ननववर्ष