Join us

रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात पाहुण्यांची घेतली विशेष काळजी; मेन्यूमध्ये काय असणार स्पेशल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 18:33 IST

रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचा मेन्यू हा खास पाहुण्यांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी या लव्हबर्ड्सचं लग्न चर्चेत आहे.  येत्या २१ फेब्रुवारीला त्यांचं लग्न गोवा येथे होणार आहे. सध्या दोघांच्या घरात लग्नाची लगबग सुरु झाली आहे. सध्या या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहेत. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी रविवारीच गोव्यामध्ये पोहचले. या कपलच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील गोव्यामध्ये पोहचले आहेत. लग्नात कपडे, डेकोरेशन, जागा, गिप्ट आणि दागिने याकडे सर्वच लक्ष देत असतात. पण रकुल प्रीत आणि जॅकीने लग्नाला खास बनवण्यासाठी लग्नात खास मेन्यू बनवला आहे. 

 अभिनेते आणि अभिनेत्री म्हटल्यावर त्यांच्या लग्नाचा थाटमाटही खूप मोठा असतो हे आपण पाहतो. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थाही अतिशय चोख ठेवली जाते. पाहुण्यांची येण्या जाण्याची, राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत तसूभरही कमी ठेवून चालत नाही. इतकेच नाही तर या ग्रँड लग्नाचे मेन्यूही अतिशय शाही असतात. असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवले जातात. 

 मिळालेल्या माहितीनुसार,  लग्नाचे ठिकाण सर्व सुविधा अतिशय उत्तमरित्या करण्यात आल्या आहेत. रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचा मेन्यू हा खास पाहुण्यांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. मेन्यूमधील पदार्थ पूर्णपणे हे हेल्दी राहतील याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. पदार्थांमध्ये ग्लूटेन फ्री आणि शुगर फ्री डिशेसला प्राधान्य देण्यात आलं आहे. विविध प्रकारचे देशी-विदेशी पदार्थही लग्नाच्या मेन्यूमध्ये असणार आहेत. याशिवाय शुशी फूड्सचाही समावेश करण्यात आला आहे.

 

आपल्या लग्नात रकुल ही तरुण तहलानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पिकॉर, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांनी डिझाईन केलेला आऊटफिट रकुल लग्नात परिधान करणार आहे. याशिवाय रकुल आणि जॅकी यांनी आधी परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतात लग्न करण्याचा सल्ला दिला.  त्यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकीनं आपला निर्णय बदलला. आता या दोघांच्या लग्नासाठी त्यांचे खूपच उत्सुक आहेत.  

टॅग्स :रकुल प्रीत सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडजॅकी भगनानीलग्नगोवा