Join us

श्रीरामाच्या गजरात अयोध्यानगरी दुमदुमली, तर 'या' गाण्याने सोशल मीडियावर तोडले सर्व रेकॉर्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:08 PM

लोकांच्या हातातील मोबाईलवर केवळ श्रीरामाची गाणी ऐकू येत होती.

अयोध्या रामजन्मभूमी येथे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर उभारण्यात आलं. २२ जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी संपूर्ण देशभरातील वातावरण राममय झालं होतं. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रभू श्रीरामाचाच गजर होतात. अगदी लोकांच्या हातातील मोबाईलवर केवळ श्रीरामाची गाणी ऐकू येत होती. त्यातलंच एक गाणं म्हणजे 'मेरे राम आएंगे' (Mere Ram Ayenge).

'राम आएंगे' भजन खूपच पॉप्युलर झालं आहे. याचा अंदाज तुम्हाला गाण्याला मिळालेल्या व्ह्युजमधून घेता येईल. या गाण्यावर एकाच दिवसात तब्बल १० लाख लोकांनी रील्स बनवत नवा रेकॉर्ड रचला. घराघरात केवळ हेच गाणं वाजत होतं. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने या गाण्याची खूप क्रेझ पाहायला मिळाली. गाण्यातून व्यक्त होणारे भाव थेट मनाला भिडणारे आहेत. युट्यूबवर तर गाण्याला 3.6 मिलियनपेक्षा जास्त रील्स बनले गेले. तर 26 लापेक्षा जास्त व्ह्युज गाण्याला मिळाले. गाणं पाहून प्रभू श्रीरामाचंच दर्शन घेतल्यासारखं लोकांना वाटत होतं. प्रत्येकाच्या ओठावर फक्त हेच गाणं होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फक्त हे गाणं गुणगुणताना दिसले.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत सीतेच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि समीर देशपांडे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. विशाल मिश्रा, पायल देव यांनी हे गाणं गायलं आहे. तर मनोज मुंतशीर यांचे शब्द आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने २ महिन्यांपूर्वीच हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलं होतं. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाराम मंदिरअयोध्या