श्रीनगरमध्ये आयोजित G20 राष्ट्रगटाची पर्यटनविषयक परिषदेत साऊथ अभिनेता रामचरणने (Ramcharan) हजेरी लावली. श्रीनगरच्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये जी 20 पर्यटन कार्यसमूहाची तिसरी बैठक सुरु झाली. यावेळी परिषदेत 'नाटू नाटू'चा आवाज घुमला. दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे बोक यांनी देखील रामचरणसह गाण्यावर ठेका धरला. रामचरणने व्यासपीठावरुन फिल्म पर्यटनाची स्तुती केली. तसंच यावेळी त्याने काश्मीरविषयीही वक्तव्य केलं.
रामचरण म्हणाला, "1986 मी वडिलांसोबत काश्मीरला आलो होतो. माझ्या वडिलांनी गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये अनेक सिनेमांचं शूटिंग केलं आहे. मी 2016 मध्ये इथे शूट केलं होतं. इथे एक वेगळीच जादू आहे जी प्रत्येकाला आकर्षित करते. संपूर्ण जगाने हा स्वर्ग बघितला पाहिजे.लोक शूटिंगसाठी परदेशात जातात. पण मला वाटतं काश्मीरहून सुंदर कोणतंच ठिकाण नाही.म्हणूनच याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात."
रामचरणला 'आरआरआर'(RRR) चित्रपटातील गाण्याचा अर्थही विचारण्यात आला. तो म्हणाला, 'जे मनाला चांगलं वाटेल'. यानंतर त्याने व्यासपीठावर दक्षिण कोरियाई राजदूत आणि टीमसोबत 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स केला. तसंच त्यांना या स्वर्गाबद्दल तुमच्या देशातील लोकांना नक्की माहिती द्या असं आवाहन केलं.