कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरातच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. शूटिंग बंद असल्याने सध्या चॅनल्सवरील मालिका बंद आहेत. त्यामुळे जुन्या मालिका रामायण आणि महाभारत सुरू झाल्या आहेत. रामायण या मालिकेला चांगलाच टीआरपी मिळत आहे. आता टिवटरवर अभिनेता अरूण गोविल यांनी एंट्री केली आहे. परंतु, आता अरूण गोविल यांच्या नावाने चार अकाऊंट बनवण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता खऱ्या अरूण गोविल यांना ओळखणे मुश्किल झाले आहे.
जुन्या काळी एक वेळ अशी होती की, अरूण गोविल यांचे चाहते त्यांची अक्षरश: पूजा करायचे. त्यांची चाहत्यांमध्ये खुप क्रेझ असायची. अजूनही टिवटरवर चाहते तशीच क्रेझ दाखवत आहेत. अशातच एका टिवटर अकाऊंटवरून एक टिवट आले. या टिवटमध्ये लिहिले होते की, ‘अखेरीस मी टिवटरवर आलो. जय श्रीराम..’ या टिवटला ६२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्यांचे ३६ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्सही झाले आहेत.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता दूरदर्शनने रामायण व महाभारत सारख्या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात खास लोकांच्या मनोरंजनासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि आता त्याचे परिणाम समोर आहे. होय, रामायण या मालिकेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रेम मिळत असल्याचे चित्र आहे.