कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर तिच्या आगामी सिनेमा 'धकड'शी संबंधित अपटेस् शेअर करत असते. कंगनाने नुकताच सिनेमाशी संबंधित एक पोस्ट केली होती. ज्यात तिचा क्लोजअप फोटो होता. या फोटोला घेऊन चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्ट केली होती. आता हे ट्विट कुठे दिसत नाही आहे.
राम गोपाल वर्मांनी केलं कौतुक या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी कंगनाला अणुबॉम्ब म्हटले होते. राम गोपाल वर्मा यांनी कंगनाच्या फोटोचे कौतुक केलं होतं. त्यांनी लिहिले की, चित्रपटचा निर्माता म्हणून कारकीर्दीत, एखाद्या कलाकाराचे ऐवढं चांगलं क्लोजअप पाहिले नाही. त्यांनी लिहिले होते की, कोणत्याही कलाकारमध्ये इतकी ओरिजिनॅलिटी आणि इंटेंसिटी पाहिली नाही. मात्र राम गोपाल वर्मांचं हे ट्विट आता डिलीट झाले आहे पण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.