Join us

घटस्फोटावरून आमिर व किरणला ट्रोल करणाऱ्यांना राम गोपाल वर्माचं उत्तर; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 1:05 PM

आमिर व किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णयांचा अनेकांनी आदर केला. पण ट्रोल करणाऱ्यांची संख्याही कमी नाही...

ठळक मुद्दे ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) पत्नी किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. आमिर आणि किरण यांनी परस्परांच्या सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. दोघांनीही ऑफिशिअल स्टेटमेंंट जारी करत, घटस्फोटाच्या निर्णयाची माहिती दिली. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचा आदर केला. पण ट्रोल करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. अनेकांनी आमिर व किरण या दोघांनाही ट्रोल करण्यास सुरूवात केली. आमिर व किरण राव या ट्रोलर्सला उत्तर देण्याच्या भानगडीत पडणा-यांपैकी नाहीत. पण दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma)  हे मात्र लगेच किरण व आमिरच्या बाजुने मैदानात उतरले. ट्रोलर्सला त्यांनी चांगलंच सुनावलं.

 ‘घटस्फोट घेण्याचा निर्णय आमिर व किरण यांचा स्वत:चा निर्णय आहे. मग  इतरांना अडचण का आहे? यावरून किरण व आमिर यांना वैयक्तिक ट्रोल करणारे मूर्खपणा करतायत. त्या दोघांचा निर्णय अतिशय खासगी व प्रोफेशनल आहे, अशा आशयाचे ट्वीट राम गोपल वर्मा यांनी केलं आहे.

पुढच्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी आमिर व किरण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.‘आमिर व किरण तुमचं आयुष्य आधीपेक्षा अधिक ‘रंगीन’ होईल, अशी कामना मी करतो. माझ्या मते, लग्नापेक्षा घटस्फोट अधिक चांगल्याप्रकारे सेलिब्रेट व्हायला हवा. कारण घटस्फोट हा विचारांती घेतलेला निर्णय असतो आणि लगं्न अज्ञान आणि मूर्खता असतं,’असं त्यांनी म्हटलं आहे. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणनं 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं.  2011 मध्ये सरोगसीच्या मदतीनं त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता.  

टॅग्स :आमिर खानकिरण रावराम गोपाल वर्मा