Join us

Ram Kapoor : राम कपूरचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, दारी उभी केली इतक्या कोटींची ड्रिम कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 15:11 IST

Ram Kapoor : अभिनेता राम कपूर गेल्यावर्षी एक अलिशान व्हिला खरेदी केला होता. या व्हिलाचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले होते. आता राम कपूरने कोट्यवधीची अलिशान कार खरेदी केली आहे.

छोट्या पडद्यासोबतच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा अभिनेता राम कपूर गेल्यावर्षी एक अलिशान व्हिला खरेदी केला होता. 20 कोटींच्या या व्हिलाचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले होते. आता राम कपूरने कोट्यवधीची अलिशान फरारी खरेदी केली आहे.

होय,  राम कपूरने नुकतीच ऑरेंज कलरची फरारी गाडी खरेदी केली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फरारीची किंमत 5.40 कोटींच्या घरात आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने राम कपूर व त्याची पत्नी गौतमी कपूरचा कारसोबतचा फोटो शेअर केला. या अलिशान गाडीतून फिरणं, हे राम कपूरचं स्वप्न होतं. आता त्याने आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राम कपूरने ब्ल्यू कलरची पॉर्श कार खरेदी केली होती. त्यावेळी त्या कारची किंमत 1.83 कोटी रूपये होती. पॉर्शने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर राम कपूर व गौतमी कपूरचा गाडीसोबतचा फोटो शेअर केला होता. 

  ‘कसम से’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’सारख्या मालिकांमुळे राम कपूर घराघरांत पोहोचला.  राम कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. 1997 मध्ये ‘न्याय’ या मालिकेतून त्याने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तो घर एक मंदिर,  क्यूंकी सास भी कभी बहू थी, दिल की बातें दिल ही जाने अशा अनेक मालिकांमध्ये झळकला.

‘घर एक मंदिर’च्या वेळी राम कपूरची गौतमीशी भेट झाली होती. या शोमध्ये दोघेही लीड रोलमध्ये होते आणि त्यादरम्यान दोघे प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर  2003 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे.  

टॅग्स :राम कपूरटिव्ही कलाकारसेलिब्रिटी