Ramayan Star Arun Govil Buys Mercedes-Benz: 80 च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ (Ramanand Sagar's Ramayan) या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. टीव्हीवर ही मालिका लागली की, भारतभर अघोषित कर्फ्यु असल्यासारखे रस्ते सुनसान पडायचे. राम सीता झालेल्या कलाकारांच्या लोक पाया पडायचे. या मालिकेत अरुण गोविल (Arun Govil) यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका इतकी अफाट गाजली होती की, लोक घरामध्ये चक्क प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते.
सध्या अरूण गोविल चर्चेत आहेत ते एका वेगळ्या कारणानं. होय, अरूण यांनी नुकतीच Mercedes Benz ही अलिशान गाडी खरेदी केली आहे. या गाडीची एक छोटीशी झलक दाखवणारा व्हिडीओ अरूण गोविल यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मग काय, अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी मात्र त्यांची चांगलीच मजाही घेतली. अरूण गोविल यांची नवीकोरी कार पाहून अनेक चाहत्यांना पुष्पक विमान आठवलं. चाहत्यांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या.
‘हे प्रभु, पुष्पक विमान के स्थान पर आप यह कैसा मेड इन जर्मनी वाहन लेकर आ गए? प्रभु, कम से कम आपको भक्तों की शीघ्र आहत हो जाने वाली भावनाओं का तो ध्यान अवश्य ही रखा जाना चाहिए था,’ अशी कमेंट एका चाहत्यानं केली.
‘प्रभु आपको क्या जरूरत थी लेने की आपके लिए तो स्वर्ग से पुष्पक विमान आता है,’ अशी कमेंट अन्य एका चाहत्यानं केली. ‘काश, त्रेतायुग में भी आपके पास गाडी होती तो आपको जंगल जंगल भटक कर श्रीलंका नहीं जाना पडता,’ अशा शब्दांत एका चाहत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘प्रभु, उडन खटोला ही ठीक था, इसमें तो डिजल भी खर्च होगा. कंद मूल खा के वनवासी की जिंदगी बिताने वाले इस खर्च को कैसे वहन करेंगे प्रभु?’, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्यानं केली.
1977 साली ‘पहेली’ या चित्रपटातून अरूण गोविल यांचा डेब्यू झाला. बडजात्यांनी तीन सिनेमांची डील साईन केली होतीच. त्यातील पहिला सिनेमा होता, ‘सावन को आने दो’. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि अरूण गोविल स्टार झाले. 1981 मध्ये आलेला त्यांचा ‘जिओ तो ऐसे जिओ’ हा सिनेमाही हिट झाला.
अरूण गोविल यांचं फिल्मी करिअर सुरू असताना 80 च्या दशकात ते छोट्या पडद्याकडे वळले. ‘रामायण’ या मालिकेने अरूण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली मात्र त्यांचं बॉलिवूडमधील करिअर मात्र या मालिकेसोबतच संपलं. कारण या मालिकेनंतर कोणताही निर्माता त्यांना काम देईना. रामाची भूमिका साकारल्यानं तुमची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा खूपच प्रभावी आहे, ती खोडून आम्ही तुम्हाला सहाय्यक अभिनेत्याची किंवा इतर लहान-मोठ्या भूमिका देऊ शकत नाही, असं निर्माते त्यांना तोंडावर सांगत.