Join us  

श्रीरामाला एकटं सोडू नका! 'रामायण'च्या सीतेची पंतप्रधानांना विनंती; म्हणाल्या,...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 2:47 PM

जेव्हा मला आरएसएस कार्यालयातून फोन आला तेव्हा...

संपूर्ण देशवासियांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण २२ जानेवारी रोजी येणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधून झालं असून प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हजारो लोकांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत श्रीराम आणि सीता मातेची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल (Arun Govil) आणि दीपिका चिखलिया (Deepika Chikhlia)  यांनाही आमंत्रण मिळालं आहे. दीपिका चिखलिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एका मुलाखतीत दीपिका चिखलिया म्हणाल्या, "हा माझ्यासाठी खूपच ऐतिहासिक दिवस आहे. येणाऱ्या पिढीसाठीही हा दिवस महत्वाचा आहे कारण 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत परत येत आहेत. आपल्या घरी परतत आहेत. मी रामभक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो दिवस खरोखरंच भावूक करणारा असणार आहे. सर्वच भारतीयांसाठी तो दिवस खास असणार आहे. येणाऱ्या पिढीलाही आपण हे सांगू शकू ही आम्ही त्या दिवसाचे साक्षी आहोत."

त्या पुढे म्हणाल्या, "मला हे आमंत्रण मिळेल अशी अजिबातच अपेक्षा नव्हती. जेव्हा मला आरएसएस कार्यालयातून फोन आला तेव्हा ते म्हणाले की मी सर्वांसाठी सीताच आहे.सगळे मला याच नावाने ओळखतात. तुमचं तिथे असणं गरजेचं आहे. म्हणून हे आमंत्रण स्वीकारावं. मी तेव्हा इतकी खूश झाले की मला पटकन विचारलं तुम्हीही मला सीता समजता? तर ते म्हणाले काही शंकाच नाही."

रामाच्या बाजूला सीतेची मूर्ती नाही

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला सीता मातेचीही मूर्ती असायला हवी होती अशीही प्रतिक्रिया दीपिका यांनी दिली. त्या म्हणाल्या, "मी या मुलाखतीतून पंतप्रधानांना विनंती करते की अयोध्येत श्रीरामासोबत सीता मातेचीही मूर्ती विराजमान करावी. त्यांनाही जागा मिळावी. नक्कीच अशी जागा असेल जिथे राम आणि सीता विराजमान होऊ शकतील. रामाला एकटं सोडू नका. त्यांचं अयोध्येत बालपण गेलं आहे मला मान्य आहे. ते खूपच प्रभावशाली आहेत. सीता मातेचीही मूर्ती विराजमान झाली तर मलाच काय सर्वच महिलांना आनंद होईल."

टॅग्स :रामायणनरेंद्र मोदीअयोध्याराम मंदिर