Join us

'रामायण'चा एका एपिसोडवर तयार करण्यासाठी व्हायचे फक्त इतके पैसे खर्च, पण कमाईचा आकडा पाहून उंचावतील भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:57 AM

तुम्हाला माहिती आहे का, रामानंद सागर यांना 'रामायण'चा एक एपिसोड तयार करण्यासाठी किती पैसे खर्च करावं लागत होते?

Ramanand Sagar Ramayan: टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक वेळा रामायण  (Ramayan)बनले आहे, परंतु आजपर्यंत 1987 मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण'ला कोणीही टक्कर देऊ शकले नाही. या रामायणात अरुण गोविल(Arun Govil)  यांनी रामाची भूमिका साकारली आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. या रामायणात दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) सीतेच्या भूमिकेत तर अरविंद त्रिवेदी(Arvind Trivedi) रावणाच्या भूमिकेत दिसले होते.कोरोना काळात या शो ने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. पण तुम्हाला माहिती आहे का या रामानंद सागर यांना हा शो तयार करण्यासाठी किती खर्च लागला होता. 

या सर्वांनी रामायणात इतका जबरदस्त अभिनय केला की आजही लोक त्यांनी साकारलेल्या भूमिका विसरु शकले नाहीत. आज एखादी सीरियल बनवली जाते तेव्हा  एक एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये लागतात. जर ती सीरिअल धार्मिक असेल तर तिचा बजेट आणखी वाढतो पण फायदा ही तितकाच असतो. त्या काळात रामायणाचा एक भाग बनवण्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च केले जात होते. त्याचवेळी, शोच्या एका एपिसोडमधून निर्मात्यांना सुमारे 40 लाखांची कमाई करायचे.

रामायणाचे प्रसारण भारतासह आणखी ५५ देशांमध्ये झालेशोच्या संपूर्ण कमाईचा विचार केला तर ती फक्त 30 कोटींपेक्षा जास्त आहे. रामानंद सागर यांच्या समायरणचे ७८ भाग प्रसारित झाले होते, जे ३५ मिनिटांचे असायचे. ही मालिका सुरू झाली तेव्हा पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. भारताव्यतिरिक्त आणखी ५५ देशांमध्ये रामायण प्रसारित झाले.

 

टॅग्स :रामायणटिव्ही कलाकार