Join us

Ramayana : रणबीर कपूर-साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये यश बनणार रावण, घेतलं इतक्या कोटींचं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 1:44 PM

Ramayana : नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता यशच्या मानधनासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता चाहत्यांमध्ये त्यांंचा आगामी चित्रपट रामायणबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता कन्फर्म झालंय की यश चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे आणि यासाठी त्यानं तगडं मानधन घेतलं आहे.

केजीएफ फेम यश रामायण चित्रपटात दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे. यात तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्याव एचटी सिटीच्या रिपोर्टनुसार, रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी यशने जवळपास १५० कोटी मानधन घेतले आहे. एका सूत्राच्या माहितीनुसार, चित्रपटात यशने जवळपास १०० ते १५० कोटी रुपये मानधन घेतले आहे. मानधनाचा आकडा शूटच्या दिवसांवर अवलंबून आहे. आतापर्यंत यश चित्रपटात नसल्याचे वृत्त ऐकायला मिळत होतं. मात्र आता तो रामायणमध्ये दिसणार आहे. 

लूक्स आणि शरीरयष्टीसाठी यश घेणार मेहनतसूत्रांनी म्हटले की, त्यांना माहित आहे की, यश केजीएफच्या तिसऱ्या भागाचं काम करतो आहे. त्यातून पण तो वेळ काढून दोन्ही इंडस्ट्रीत काम करणार आहे. असे सांगितले जात आहे की, चित्रपटात एकीकडे यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. सूत्रांनी सांगितले की, चित्रपटात यशचा खूप वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. जो केजीएफपेक्षाही वेगळा असेल. यशने नितेश तिवारी यांच्यासोबत यासंदर्भात बोलणं सुरु केलं आहे.    

टॅग्स :रणबीर कपूरसाई पल्लवीयश