Join us

एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 09:46 IST

राम्या आज ५० वयाची झाली असतानाही साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते. चला आज तिच्या वाढदिवसांनिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी...

'बाहुबली'तील 'शिवगामी देवी' भूमिका साकारणारी अभिनेत्री राम्या कृष्णनचा आज वाढदिवस. देशातील सर्वात चांगल्या कलाकारांपैकी एक राम्या आज ५० वर्षाची झाली. एकीकडे अभिनेत्रींचं वय वाढताना त्यांना मिळणारं मानधन कमी होत जातं. पण राम्या याला अपवाद आहे. राम्या आज ५० वयाची झाली असतानाही साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते. चला आज तिच्या वाढदिवसांनिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी...

बाहुबलीने दिली वेगळी ओळख

साऊथमधील सुपरहिट सिनेमा 'बाहुबली'मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आज जगभरात ओळख मिळाली आहे. हा सिनेमा हिट झाल्यावर यातील सर्वच कलाकारांनी आपलं मानधन वाढवलं. त्यातीलच एक अभिनेत्री राम्या कृष्णन आहे. राम्याने बाहुबली १ आणि बाहुबली २ या दोन्ही सिनेमात महत्वाची  भूमिका बजावली होती. सिनेमात शिवगामी देवीच्या भूमिकेत दिसलेल्या राम्याची ही भूमिका लोकांच्या पसंतील उतरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार राम्याने या सिनेमानंतर तिचं मानधन वाढवलं आहे. 

किती घेते मानधन?

अभिनेत्री राम्या सिनेमासाठी तमन्ना भाटिया आणि रकुल प्रीत सिंहपेक्षाही जास्त मानधन घेते. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, राम्याने तेलुगू सिनेमा 'सैलाजा रेड्डी अल्लुदु'मध्ये काम करण्यासाठी एका दिवसाच्या शूटींगसाठी ६ लाख रूपये मानधन घेतलं होतं. या सिनेमासाठी तिने २५ दिवसांच्या शूटींगचा करार केला होता. त्यानुसार तिने २५ दिवसांसाठी १.५० कोटी रूपये मानधन घेतलं होतं. राम्या घेत असलेलं हे मानधन साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त आहे. 

सामान्यपणे साऊथ सिनेमांमधील टॉप अभिनेत्री तमन्ना भाटिया एका सिनेमासाठी ६५ लाख रूपये मानधन घेते. तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एका सिनेमासाठी १ कोटी रूपये मानधन घेते. 

...म्हणून बॉलिवूड सोडलं

राम्याने 'खलनायक', 'क्रिमिनल', 'शपथ' आणि 'बडे मियां छोटे मियां'सारख्या सिनेमात काम केलंय. जेव्हा तिला विचारण्यात आलं की, इतके मोठे सिनेमे करूनही बॉलिवूड का सोडलं? तर यावर उत्तर दिलं होतं की, 'मी ब्रेक घेतला नाही. मुळात माझे सिनेमे चांगले चालत नव्हते आणि मी ऑफरमध्ये फार इंटरेस्ट घेतला नाही. दरम्यान मी साऊथच्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये चांगलं काम करत होते'. 

टॅग्स :रम्या कृष्णनTollywoodबॉलिवूड