'बाहुबली' चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या जंगलामध्ये तो या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. ही माहिती खुद्द त्याने ट्विटरवर दिली आहे.
राणा दग्गुबतीने ट्विट केले की,'सकाळी... हाथी मेरे साथी चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळच्या जंगलात रवाना.'
'हाथी मेरे साथी' चित्रपट मानव व प्राण्यांवर आधारीत असून यात राणासोबत पुलकित सम्राट, विष्णु विशाल, जोया हुसैन व कल्कि कोचलिन यासारखे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत.
इरॉस इंटरनॅशनलच्या 'हाथी मेरे साथी' चित्रपटाचे तमीळमध्ये कादन व तेलगूमध्ये अरान्या असे आहे. प्रभू सोलोमन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तेलगू व तमीळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरीत असून राजेश खन्ना व तनुजा अभिनीत १९७१ साली प्रदर्शित झालेला हाथी मेरे साथीला श्रद्धांजली देणार आहे. राणा दग्गुबातीचा चित्रपट 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड आधीच तोडले आहेत. जवळपास 2000 कोटींची कमाई बाहुबली 2 ने केली होती. 2017 मधला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान 'बाहुबली 2' ला आधीच मिळाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. बाहुबली 2 ने एक नवा इतिहास लिहिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी 'दम मारो दम', 'डिपार्टमेंट' आणि बेबीसारख्या चित्रपटांमध्ये ही त्यांने भूमिका केली आहे. राणा दग्गुबाती हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन सिरीज ‘स्टार वार्स’चे निर्माता जॉज लुकास आपले प्रेरणास्थान मानतो. त्याचे घर पाहण्याची राणाची फार इच्छा आहे.