Join us

सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 1:14 PM

रणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचे मानले जात आहे. अशात आलिया व रणबीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे.

ठळक मुद्देतूर्तास आलिया व रणबीरच्या लग्नाची कुठलीही ऑफफिशिअल घोषणा झालेली नाही.

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता हेच बघा ना, सध्या रणबीर कपूरआलिया भटच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होतेय. रणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचे मानले जात आहे. अशात आलिया व रणबीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. या पत्रिकेनुसार, 22 जानेवारी 2020 रोजी राजस्थानच्या जोधपूरमधील उमेद पॅलेस येथे हे लग्न होणार आहे. 

रणबीर व आलियाच्या लग्नाची ही पत्रिका पाहून साहजिकच चाहते क्रेजी झाले आहेत. तुम्हीही असेच क्रेजी होण्यापूर्वी ही लग्नपत्रिका जरा लक्षपूर्वक बघा. होय, कारण व्हायरल झालेली ही लग्नपत्रिका बघितल्यानंतर ती फोटोशॉप्ड असल्याचे लगेच तुमच्या लक्षात येईल. या पत्रिकेत अनेक चुका आहेत. स्पेलिंगच्याच नाही तर व्याकरणाच्याही असंख्य चुका आहेत.

पत्रिकेवर आलियाच्या नावाचे स्पेलिंग Aliya  असे लिहिले आहे. प्रत्यक्षात आलिया Alia असे लिहिते. याशिवाय यात आलिया ही मुकेश भट यांची मुलगी असल्याचे म्हटले आहे. आलिया महेश भट यांची मुलगी आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. एवढेच नाही तर वेडिंग डेट लिहिताना  22nd जानेवारीऐवजी 22th जानेवारी असे लिहिले आहे. तूर्तास आलिया व रणबीरच्या लग्नाची कुठलीही ऑफफिशिअल घोषणा झालेली नाही. लवकर आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर