Join us

Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:14 AM

Brahmastra Trailer: दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून फॅन्स क्रेझी झालेत.

Brahmastra Trailer : दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ (Brahmastra ) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि फॅन्स हा ट्रेलर पाहून क्रेझी झालेत.  2 मिनिट 51 सेकंदाचा हा ट्रेलर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. ट्रेलरमधील अनेक सीन्स अंगावर शहारे आणतात. ट्रेलरची सुरूवात होते ती अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजातील संवादाने.

‘जल, वायु, अग्नी... प्राचीन काल से हमारे बीच कुछ ऐसी शक्तियां हैं जो अस्त्रों में भरी हुई हैं. ये कहनी है इन सारे अस्त्रों के देवता की- ब्रह्मास्त्र... और एक ऐसे नौजवान की, जो इस बात से अनजान है कि वो ब्रह्मास्त्र की किस्मत का सिकंदर है...शिवा...’, असा त्यांच्या भारदस्त आवाजातील संवाद ऐकू येतो आणि पाठोपाठ शिवा अर्थात रणबीर कपूरची एन्ट्री होते.  

ट्रेलरमध्ये फँटसी सीन्स आहेत. जबरदस्त ग्राफिक्ससह आलिया व रणबीरची ( Ranbir Kapoor Alia Bhatt ) रोमॅन्टिक केमिस्ट्री आहे. केशरिया या गाण्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ‘मैं आग से जलता नहीं, कुछ रिश्ता है मेरा आग से...,’ असं शिवा म्हणतो. यानंतर ब्रह्मास्त्र या अस्त्राची कथा उलगडत जाते.या चित्रपटात अमिताभ बच्चन, अक्किनेनी नागार्जुन, मौनी रॉय हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मौनी रॉय यात जुनून नावाच्या एका निगेटीव्ह रोलमध्ये आहे.

‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. येत्या 9 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटात शाहरूख खान कॅमिओ रोलमध्ये असल्याची चर्चा आहे. अर्थात ट्रेलरमध्ये कुठेही त्याची झलक दिसली नाही. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’च्या ट्रेलरला चाहत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ट्रेलर पाहून चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. अनेकांनी हा सिनेमा ब्लॉकबस्टर असेल, असं भाकित केलं आहे. अनेक चाहते चित्रपटातील व्हीएफएक्सचं कौतुक करत आहेत.

टॅग्स :ब्रह्मास्त्ररणबीर कपूरआलिया भटअमिताभ बच्चनमौनी राॅय