सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. यात विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या सर्वत्रच चर्चा रंगल्या आहेत. आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचे लव्हबर्ड आलिया आणि रणबीर देखील लग्न करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षापासून चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु होतं. दोघेही खुल्लम खुल्ला सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत असतात. इतकंच काय तर मिळालेल्या वेळेत दोघेही एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. एकमेकांना डेट करणारी जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा जोरदार चर्चा सुरु आहेत.
येत्या डिसेंबरमध्ये दोघांचं शुभमंगल पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणबीर आणि आलियाने वेळ घेतलाय. आता दोघांच्या बिझी शेड्युअलचा विचार करता दोघांसाठी सोयीच्या तारखेवर लग्न पार पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा लग्नसोहळा पार पडेल.
विराट आणि अनुष्का यांच्या प्रमाणेच या कपलचाही वेडिंग प्लॅन आहे. दीपिका और रणवीर यांचंही लग्न इटलीमध्येच पार पडलं होतं. आता यांच्यापाठोपाठ आलिया रणबीरचाही इटलीमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीसुद्धा आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत चर्चा होत्या.मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला असं म्हटलं जातं.