Ranbir Kapoor, Alia Bhatt wedding : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt ) आज लग्नाच्या आणाभाका घेत आहेत. संपूर्ण कपूर व भट कुटुंबाचा उत्साह ओसंडून वाहतोय. आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर आलिया व रणबीर लग्नानंतर प्रथम मीडियासमोर येऊ शकतात. त्यामुळे या जोडप्याचे नववर-वधूच्या पोशाखातील फोटो लवकरच चाहत्यांना पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी कपूर आणि भट कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवेत.लग्नासाठी भट व कपूर कुटुंब पोहोचलं आहे. दोन्ही कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.
रणबीरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर या लग्नासाठी अशा खास लुकमध्ये पोहोचल्या. यावेळी नीतू कपूर यांनी पिंक कलरचा लेहंगा घातला होता तर रिद्धिमा गोल्ड कलरच्या लेहंग्यात सुंदर दिसत होती.
आलियाची आई सोनी राजदान ही सुद्धा यावेळी दिसली. आलियाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. तिने पिंक आणि ग्रीन कलरची साडी नेसली होती.
करिना कपूर आणि सैफ अली खान अशा रॉयल लुकमध्ये लग्नासाठी पोहोचलेत. यावेळी करिनाने ब्लश पिंक कलरची साडी नेसली होती तर सैफ पिंक कुर्ता व व्हाईट जॅकेटमध्ये होता.
आलियाची बेस्ट फ्रेन्ड अनिशा राजन ही सुद्धा लग्नाला पोहोचली. अरमान जैन आणि अनिशा एकाच गाडीतून लग्नस्थळी आलेत.
महेश भट आणि आलियाची चुलत बहीण पूजा भट यांचा अंदाज बघण्यासारखा होता. दोघांनीही मीडियाशी बोलण्यास नकार दिला. केवळ मीडियाला हात हलवत त्यांनी अभिवादन केलं.