Ranbir Kapoor and Alia Bhatt Mehendi : आलिया भट आणि रणबीर कपूर गेल्या 14 एप्रिलला लग्नगाठ बांधली. म्हणायला हा लग्नसोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडला. पण या लग्नाची जबरदस्त चर्चा झाली. अद्यापही लग्नाच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. आता तर यात भर पडली आहे. होय, आलिया व रणबीरच्या लग्नात खास पाहुणा असलेल्या करण जोहरने (Karan Johar) एक धम्माल किस्सा शेअर केला आहे. ‘हुनरबाज’ या रिअॅलिटी शोदरम्यान आलिया आणि रणबीरच्या मेहंदी सेरेमनीदरम्यानचा त्याच्यासोबत घडलेला मजेशीर किस्सा त्याने सांगितला. (Karan Johar Oops Moment)
13 एप्रिलला आलिया व रणबीरचा मेहंदी सेरेमनी पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये करणचा समावेश होता. करणनेही मोठ्या हौसेनं आपल्या हातावर मेहंदी काढून घेतली. पण काहीच वेळात त्याची अवस्था बघून सगळे पोट धरून हसू लागलेत. होय, हातावरची मेहंदी अख्ख्या चेहºयाभर पसरली होती आणि ते पाहून सगळ्यांना हसू आवरत नव्हतं.
करणने हा किस्सा रंगवून सांगितला. त्याने सांगितलं, ‘ मी आयुष्यात पहिल्यांदाच मेहंदी लावली होती. त्यात खूप उकाडा होता आणि घामही खूप येत होता. त्या नादात मेहंदी लावलेल्या हातानंच मी घाम पुसला. हाताला मेहंदी लागलीये, हेही माझ्या ध्यानात नव्हतं. मग काय, माझ्या कपाळावर, तोंडावर आणि डोक्यावर हाताची मेहंदी लागली होती. मी लगेच ती धुवून टाकली. नशीब की, आलियाच्या मेकअप आर्टिस्टनं मला वेगवेगळ्या प्रकारची लोशन लावली नाहीतर माझा चेहरा मेहंदीनं रंगला असता.’ याचा व्हिडीओ कलर्स वाहिनीनं शेअर केला आहे. यात परिणीती चोप्रा करणच्या तळहातावरचं खराब झालेलं मेहंदीचं डिझाईन सर्वांना दाखवताना दिसतेय.