Join us

Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:11 PM

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती आणि आता..

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. मात्र आता असे कळतेय की हे कार्ड फेक होते. आता मिळालेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर दोन नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समजतेय. पुढच्या दोन आठवड्यात लग्न करणार आहेत. लग्नासाठी दोघांनी फ्रांसला पसंती दिली आहे. शेफ ऋतु डालमियाला केटरिंग अरेंजमेंटसाठी अप्रोच करण्यात आले आहे. अनुष्का-विराटच्या लग्नातदेखील ऋतुने केटरिंग सर्विस दिली होती.      

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या पत्रिकेत आलिया रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त  22 जानेवारी लिहिला होता. रणबीर व आलियाच्या लग्नाची ही पत्रिका पाहून साहजिकच चाहते क्रेजी झाले होते.  या पत्रिकेनुसार, 22 जानेवारी 2020 रोजी राजस्थानच्या जोधपूरमधील उमेद पॅलेस लग्न करणार होते मात्र दोन दिवसांपूर्वीच आलिया लंडनला रवाना झाली आहे आणि रणबीर आधीपासूनच लंडनमध्ये आहे. त्यामुळे हे संकेत जवळपास लग्नाचे असल्याचे दिसतायेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकर आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर