कपूर घराण्याचा ‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूर याचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. १९८२ साली आजच्याच रोजी रणबीरचा जन्म झाला. रणबीरच्या जन्मामुळे कपूर घराण्याची प्रत्येक जण आनंदी होता. पण राज कपूर यांच्या आनंदाला मात्र पारावार राहिला नव्हता. कारण रणबीर हा राज कपूर यांचा पहिला नातू होता. त्यांना नाती होत्या पण रणबीर हा पहिला नातू होता.ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या आपल्या बायोग्राफीत राज कपूर यांच्या रणबीरवर असलेल्या प्रेमाबद्दल लिहिले आहे. रणबीरच्या जन्मावेळी आमच्या कुटुंबात वेगळाच आनंद होता. पापांचा नाती होत्या. पण माझ्या बहीणींच्या मुलींना वेगळे आडनाव मिळाले होते. रणधीरच्या दोन मुली करिश्मा व करिना याही लग्न होऊन आपल्या घरी जाणार होत्या. अशास्थितीत राज कपूर यांना एक नातू हवा होता. रणबीरच्या जन्माने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली, असे ऋषी यांनी लिहिले आहे.
रणबीरवर राज कपूर यांचा विशेष जीव होता. म्हणूनच कपूर घराण्याचा अनमोल ठेवा त्यांनी रणबीरच्या नावे केला. होय, यातील अनमोल ठेवा म्हणजे, कपूर घराण्याचा एक पूर्वजांची आठवण असलेले सोन्याचे नाणे. या नाण्यावर अफगाणी भाषेतील काही शब्द कोरलेले आहेत. कपूर घराण्याच्या पेशावरही संबंध राहिला आहे, हे आपण जाणतोच. याशिवाय सोन्यांच्या नाण्यांची एक माळही राज कपूर यांनी रणबीरला दिली होती.
रणबीर कपूर आज एक खूप मोठा स्टार आहे, पण आजही तो आई नीतू सिंग हिच्याकडून दरमहा १५०० रूपये पॉकेटमनी घेतो.रणबीरचे फेवरेट फूड आहे मगराचे मांस. होय, एका मुलाखतीत रणबीरने खुद्द हा खुलासा केला होता.रणबीर कपूर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही़ पण चोरून लपून तो सगळ्यांनाच फॉलो करतो़ त्यांचे फोटो बघतो़
वयाच्या १५ व्या वर्षी रणबीरला निकोटीन ड्रग्जचे व्यसन लागले होते. रणबीरने ‘संजू’च्या प्रमोशनवेळी याची कबुली दिली होती. हे व्यसन सोडवण्यासाठी मी आॅस्ट्रेलियाला गेलो होतो. डॉक्टरांनी माझ्या कानात इंजेक्शन दिले होते, असे त्याने सांगितले होते.