Join us

आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:54 PM

आलिया भट्टबरोबर रणबीर कपूरला करायचं नव्हतं लग्न, स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला, "मला तिच्याबरोबर हुकअप..."

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांचे लाखो चाहते आहेत. पण, रणबीर कपूरला आलियाशी लग्न करायचं नव्हतं. रणबीरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आलियाशी लग्न करण्याआधी रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. त्यातीलच एक म्हणजे अनुष्का शर्मा. रणबीरने कॉफी विथ करणमध्ये याचा खुलासा केला होता. 

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'चं आठवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे पर्व सुरू होण्याआधी आधीच्या पर्वातील रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रणबीर कपूर करण जोहरच्या रॅपिड फायरमधील प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. रणबीर कपूरबरोबर कॉफी विथ करणमध्ये अभिनेत रणवीर सिंहनेही हजेरी लावली होती. 'एंटरटेनमेंट मीडिया' या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या रॅपिड फायरमध्ये करण जोहर रणबीर कपूरला "आलिया, जॅकलिन आणि अनुष्कापैकी कोणाबरोबर लग्न, हुक अप आणि खून करशील?" असा प्रश्न विचारतो. यावर रणबीर कपूर लग्न करण्यासाठी आलियाचं नाव न घेता अनुष्काचं घेतो. "मला अनुष्काबरोबर लग्न करायला आवडलं असतं. पण, सध्या ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. बाकी दोघींबरोबर मी हुक अप करेन. त्यांच्यापैकी कोणाबरोबरही मी लग्न करणार नाही," असं रणबीर म्हणतो. रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, 'कॉफी विथ करण'चं आठवं पर्व २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. करण जोहर होस्ट करत असलेला हा एक लोकप्रिय शो आहे. या शोच्या यंदाच्या पर्वात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटअनुष्का शर्मा