Join us

कपूर फॅमिलीत झाली आलिया भट्टची ‘एन्ट्री’! वाचा, ताजी बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:55 AM

२०२० पर्यंत रणबीर व आलिया लग्न करणार, असेही मानले जात आहे. तूर्तास या कपलबद्दलची ताजी बातमी म्हणजे, रणबीरच्या कुटुंबात आलियाचा प्रवेश झालाय.

ठळक मुद्देअलीकडे एका इव्हेंटमध्ये आलियाला रणबीरबद्दल विचारले गेले. तुझ्या वडिलांना रणबीर पसंत आहे, तू याबद्दल काय सांगशील, असा थेट प्रश्न तिला केला गेला. यावर आलिया काय बोलणार. ती बिचारी लाजून लाजून चूर झाली.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडचे हॉटेस्ट कपल सध्या जाम चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या कपलमध्ये प्रेम बहरले ते अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या जवळ आलेत. सुरुवातीच्या दिवसात मीडियाच्या प्रश्नांपासून, कॅमेऱ्यांपासून स्वत:ला वाचवण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेत. पण शेवटी प्रेम लपते कुठे? आता हे नाते जगजाहिर झाले आहे. दोन्ही कुटुंबाचीही परवानगी मिळाली आहे. २०२० पर्यंत रणबीर व आलिया लग्न करणार, असेही मानले जात आहे. तूर्तास या कपलबद्दलची ताजी बातमी म्हणजे, रणबीरच्या कुटुंबात आलियाचा प्रवेश झालाय. होय, मुंबई मिररने दिलेली खबर खरी मानाल तर रणबीरने अलिकडे आपल्या फॅमिली चॅट गू्रपमध्ये आलियाला सहभागी केले. या व्हाट्सअ‍ॅप चॅट ग्रूपमध्ये ऋषी कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर आणि रिना जैन असे सगळे आहेत. आता आलियाही या फॅमिली चॅट ग्रूपमध्ये असेल. एकंदर काय तर फॅमिली चॅट ग्रूपमध्ये आलियाची एन्ट्री झालीय, आता कपूर फॅमिलीत तिची एन्ट्री होईल तो दिवस दूर नाही.अलीकडे एका इव्हेंटमध्ये आलियाला रणबीरबद्दल विचारले गेले. तुझ्या वडिलांना रणबीर पसंत आहे, तू याबद्दल काय सांगशील, असा थेट प्रश्न तिला केला गेला. यावर आलिया काय बोलणार. ती बिचारी लाजून लाजून चूर झाली. मी यावर बोलू शकत नाही. असे काही विचारले की, मला लाजायला होते. पण मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते. ते जे काही करतात, ते माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते, असे आलिया म्हणाली.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर