Join us

“परेशान हो गया हूं..”, आलियाच्या ‘या’ विचित्र सवयीमुळे रणबीर कपूर त्रासला, सांगितलं बेडरूम सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:54 AM

Ranbir Kapoor , Alia Bhatt : होय, आलियाच्या एका सवयीमुळे रणबीर अक्षरश: त्रासला आहे. हे आम्ही नाही, तर खुद्द रणबीरनं सांगितलं आहे...

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) हे बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय कपल. याचवर्षी हे कपल लग्नबंधनात अडकलं आणि लग्नाला उणेपुरे दोन महिने होत नाही तोच दोघांनी गुडन्यूजही दिली. आलिया लवकरच आई बनणार आहे. साहजिक रणबीरही खुश्श आहे. बाबा बनणार असल्याचा आनंद त्यालाही आहेच. पण एका गोष्टीला मात्र तो जाम वैतागला आहे. होय, आलियाच्या एका सवयीमुळे तो अक्षरश: त्रासला आहे. हे आम्ही नाही, तर खुद्द रणबीरनं सांगितलं आहे.  एका मुलाखतीत रणबीरने आलियाच्या एका विचित्र सवयीचा खुलासा केला.

तो म्हणाला, ‘आलियाची झोपण्याची पद्धत फारच विचित्र आहे. ती रात्रभर संपूर्ण बेडवर गोल गोल फिरत असते आणि त्यामुळे मला बेडच्या एका कोपऱ्यात झोपावं लागतं. बेड कितीही मोठा असला तरी मला मात्र कोपऱ्यातच झोपावं लागतं. तिच्या या सवयीला मी खूप वैतागलो आहे. हे मला रोज सहन करावं लागतं.’

आता आलिया यावर शांत कशी बसणार? तिनेही रणबीरची पोलखोल केलीच. मला रणबीरचा शांत स्वभाव आवडतो पण कधीकधी त्याचा त्रासही होतो, असं ती म्हणाली. आलियाचं ही गोष्ट थोडी गोंधळात टाकणारी होती. मग तिने पुढचा खुलासा केला. ती म्हणाली, रणबीर माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं अनेकदा ज्या ठिकाणी काही बोलायची गरज असते, अशावेळी सुद्धा तो शांत  राहतो आणि तेव्हा त्याचं शांत राहणं मला त्रासदायक वाटतं.

सध्या आलिया व रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 400 कोटींचा बिझनेस केला आहे.  अद्यापही चित्रपट चित्रपटगृहांत सुरू आहे. पण आता या चित्रपटाला दोन नव्या चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे.  विक्रम वेधा व पोन्नियन सेल्वन हे दोन सिनेमे या शुक्रवारी रिलीज होत आहेत. अशात बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटबॉलिवूड