Ranbir Kapoor Income Source: अभिनेता रणबीर कपूरने 'अॅनिमल' चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा अॅक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूरच्या अभिनयाचेही खूप कौतुक होतंय. दरम्यान, आज आम्ही रणबीरच्या कमाईबद्दल सांगणार आहोत. शेकडो कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला रणबीर चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायातून कमाई करतो.
सावनचे शेअररणबीर कपूर 2014 पासून म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी सावनचा शेअरहोल्डर आणि ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सावनने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रणबीर ब्रँडला मार्गदर्शन करणे, प्रोग्रामिंगवर प्रभाव टाकणे आणि म्युजिक लव्हरशी कनेक्ट होण्याचे काम करतो.
मुंबई सिटी एफसीरणबीर इंडियन सुपर लीग मुंबई सिटी एफसीचा मालक आहे. इंडियन सुपर लीग संघात बिमल पारेख यांच्यासह रणबीरची 35 टक्के भागीदारी आहे. उर्वरित 65% हिस्सा सिटी फुटबॉल ग्रुप (CFG) कडे आहे, जो प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर सिटीचाही मालक आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स2022 मध्ये रणबीरने पुण्यातील ड्रोन स्टार्ट-अप कंपनी, DroneAcharya Aerial Innovations मध्ये शेअर विकत घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरने सुमारे 20 लाख रुपयांचे 37,200 शेअर्स खरेदी केले आहेत. अभिनेता आमिर खाननेही याच स्टार्टअपमध्ये सुमारे 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
इतर गुंतवणूकरणबीरने बेको, या घरगुती उत्पादनांच्या कंपनीमध्येही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्याने इथे किती गुंतवणूक केली याबाबत योग्य माहिती उपलब्ध नाही. ही कंपनी कंपोस्टेबल कचरा पिशव्या, रि-युजेबल किचन टॉवेल रोल्स, फ्लोअर क्लीनर, बांबू-आधारित फेशियल टिश्यू, बांबू टूथब्रश आणि इतर विविध उत्पादने तयार करते. दिया मिर्झा, आमिर खान आणि भूमी पेडणेकर आदींनीही या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
रिअल इस्टेटमुंबईतील वांद्रे येथे 4-बीएचके अपार्टमेंटशिवाय रणबीरकडे पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये 13 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने ही मालमत्ता तीन वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला येथून सुमारे 48 लाख रुपये वार्षिक भाडे मिळते.
प्रोडक्शन हाउस2013 मध्ये रणबीर कपूरने बर्फी चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक अनुराग बसू पिक्चर शुरू प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली होती. रणबीरनेही या चित्रपटावर पैसा लावला होता.
ब्रँड एंडोर्समेंटLays, Taswa, Asian Paints, Lenovo, Myntra, Panasonic आणि इतर बर्याच ब्रँड्ससाठी रणबीर जाहिराती करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर जाहिरातीसाठी सुमारे 6 कोटी रुपये घेतो.
चित्रपटातील कमाईमिंटच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर दरवर्षी सुमारे 30 कोटी रुपये कमावतो. प्रत्येक चित्रपटासाठी तो सुमारे 50 कोटी रुपये आकारतो. रिपोर्टनुसार, रणबीर कपूरची एकूण संपत्ती 345 कोटी रुपये आहे.