अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) 2007 साली आलेल्या 'सावरियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला मात्र रणबीरच्या अभिनयावर चाहते फिदा झाले. रणबीरने त्याच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार','बर्फी','ये जवानी है दिवानी','अॅनिमल' असे अनेक हिट सिनेमे दिले. यासोबतच रणबीरचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. एकानंतर एक टॉपच्या अभिनेत्रींसोबत त्याचं अफेअर गाजलं. यामुळे त्याच्यावर 'कॅसेनोव्हा','चीटर' असा टॅग लागला. याचं दु:ख त्याने व्यक्त केलं आहे.
रणबीर कपूरने नुकतंच 'पीपल विथ WTF' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तो म्हणाला, "मी दोन टॉपच्या अभिनेत्रींना डेट केलं आणि हीच माझी ओळख बनली. माझ्यावर 'कॅसेनोव्हा' हा टॅग लागला. मला आयुष्यातल्या एका मोठ्या पार्टसाठी धोखेबाजचा टॅग मिळाला जो अजूनही आहे. मी त्याच टॅगसोबत आयुष्यभर, जगलो आणि आजही जगत आहे."
या टॅगचा रणबीरवर किती परिणाम झाला आणि अजूनही होतो का याचंही उत्तर पॉडकास्टमध्ये असणार आहे. दरम्यान रणबीरने करिअरच्या सुरुवातीलाच दीपिका पदुकोणला डेट केले. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. काही वर्षांनी रणबीर कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघं लिव्हइन मध्येही राहत होते. हे नातंही काही वर्षात संपलं. नंतर रणबीरच्या आयुष्यात आलिया भट आली आणि दोघांनी लग्नही केलं. त्यांना राहा ही मुलगी झाली. आता रणबीरचा सुखी संसार सुरु आहे.
मधल्या काळात करिअरमध्ये आलेल्या 'बॅड पॅच'नंतर रणबीरने 'अॅनिमल' हा सुपरहिट सिनेमा दिला. शिवाय त्याचा आलियासोबत 'ब्रह्मास्त्र'ही गाजला. या दोन्ही सिनेमांचे सीक्वेल येणार आहेत. तसंच रणबीर आलिया आणि विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहे.