बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आघाडीवर आहे. 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' यासारख्या सिनेमांमध्ये तो दिसणार आहे. 'अॅनिमल'च्या भरघोस यशानंतर त्याचा भावच वधारला. वैयक्तिक आयुष्यातही रणबीर कपूर पत्नी आलिया भट आणि लेक राहा कपूरसोबत सुखी संसार करत आहे. पण नुकतंच रणबीरने आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. आलिया आपली पहिली पत्नी नाही असं तो म्हणाला. मग कोण आहे रणबीरची पहिली पत्नी?
रणबीर कपूरचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. 'बर्फी', 'ये जवानी है दिवानी', 'वेक अप सिड', 'अॅनिमल' सारखे अनेक हिट सिनेमे त्याने दिले आहेत. नुकतीच त्याने 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली. तेव्हा त्याने आपल्या पहिल्या पत्नीविषयी खुलासा केला. त्याला चाहत्याचा आलेला विचित्र अनुभव विचारण्यात आला. तो म्हणाला, "मी विचित्र अनुभव म्हणणार नाही कारण ते फार नकारात्मक वाटतं. पण माझ्या करिअरच्या अगदीच सुरुवातीला एक मुलगी होती जिला मी कधीच भेटलो नाही. माझ्या वॉचमनने मला सांगितलं की ती मुलगी भटजींसोबत घराजवळ आली होती. तिने माझ्या घराच्या गेटशी लग्न केलं जिथे मी माझ्या आईवडिलांसोबत राहत होतो. गेटवर पूजा केल्याचं दिसत होतं. कुंकू लावलं होता आणि फुलं होती. मी तेव्हा मुंबईबाहेर होतो. पण तो खरंच वेगळाच किस्सा होता. मी कधीच माझ्या पहिल्या पत्नीला भेटलेलो नाही. मला आशा आहे कधीतरी मी तिला भेटेन."
रणबीर कपूरने 'सावरियां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून लाखो तरुणी रणबीरच्या चाहत्या आहेत. 'बर्फी', 'ये जवानी है दिवानी', 'रॉकस्टार' या सिनेमातून तर त्याने सर्वांना वेडच लावलं. रणबीरच्या परफॉर्मन्सला तोडच नसते. क्रिटिक्सही त्याच्या अभिनयाचं कौतुक करतात. त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.