Join us  

रणबीर कपूरचं वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट, Animal चा टीझर रिलीज, अभिनेत्याचा अँग्री लुक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:04 AM

सिनेमाची रिलीज डेटही जाहीर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आज वाढदिवस. अभिनेत्याचा  बहुप्रतिक्षित 'अॅनिमल' (Animal) सिनेमाचा टीझर आज त्याच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलाय. अॅनिमलची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर तर ही उत्सुकता प्रचंड ताणली होती. आता रणबीरने चाहत्यांना टीझरचं गिफ्ट दिलं आहे. काही मिनिटांतच टीझर व्हायरल झालाय.

सॉलिड अॅक्शनची झलक

टीझरच्या सुरुवातीलाच रणबीर अँग्री लुकमध्ये दिसतोय. टीझरच्या पहिल्याच शॉटला रणबीर रश्मिकावर भडकताना दिसतो. अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. यानंतर अॅक्शनचा धमाका सुरु होतो. लांब दाढी, वाढलेले केस, हातात सिगारेट अशा कूल लुकमध्ये रणबीर मारधाड करताना दिसतो आहे. तर टीझरच्या शेवटी बॉबी देओलची झलक दिसते.

चाहत्यांना टीझर भलताच आवडला आहे. रणबीर कपूर तर ब्लास्ट आहे यात शंकाच नाही पण बॉबी देओलचा लुकही भारी आहे. बॅकग्राऊंड म्युझिक, कॅमेरा अँगल्स सगळंच जबरदस्त आहे. 'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अंगावर शहारे आणणारा हा टीझर पाहून आता ट्रेलरची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. १ डिसेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरअनिल कपूरबॉबी देओलरश्मिका मंदानासिनेमा