Join us

रणबीर कपूरच्या चुलत बहिणीचं नावही आहे 'आलिया', भारताबाहेरच असते स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:30 AM

कपूर कुटुंब तसं भलतंच मोठं आहे. त्यातले काही लोक लाईमलाईटपासून दूरही आहेत.

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा दबदबा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते आता रणबीर कपूर, करीना कपूरपर्यंत सगळेच आघाडीचे कलाकार आहेत. कपूर कुटुंब तसं भलतंच मोठं आहे. त्यातले काही लोक लाईमलाईटपासून दूरही आहेत. त्यातच एक म्हणजे आलिया कपूर. ही आलिया म्हणजे रणबीरची बायको नाही तर रणबीरची (Ranbir Kapoor) चुलत बहीण आहे. होय रणबीरच्या एका चुलत बहिणीचं नावही आलिया (Aliya Kapoor) आहे.

कपूर कुटुंबातील सर्वात मोठे पृथ्वीराज कपूर यांची तीन मुलं आहेत. राज कपूर, शशी कपूर आणि शम्मी कपूर. राज कपूर यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर, रितू कपूर, रीमा कपूर, राजीव कपूर ही मुलं आहेत. तर शम्मी कपूर आणि पत्नी जेनिफर केंडाल यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन अपत्य आहेत. यामध्ये करण कपूर यांची लेक आहे आलिया कपूर. तिला झॅक हा भाऊही आहे. म्हणजेच आलिया नात्याने रणबीर कपूरची चुलत बहीणच आहे. करण कपूर हे फोटोग्राफर आहेत. त्यांच्याच एका फोटोत आलिया कपूरही दिसते. आलियाचा जन्म लंडनमध्ये झाला आणि ती तिथेच स्थायिक असते. तिचा लूकही अगदी ब्रिटीश आहे. लंडनमध्ये असली तरी आलियाने अनेकदा भारतात येऊन कपूर कुटुंबाच्या फंक्शन्सला हजेरी लावली.

तर असं आहे कपूर 'फॅमिली ट्री'. रणबीर कपूरने 2022 साली आलिया भटशी लग्न केले. त्यांना राहा ही एक वर्षाची मुलगी आहे. नुकतंच ख्रिसमसच्या मुहुर्तावर रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच राहाला सर्वांसमोर आणलं. तिचे निळे डोळे पाहून सर्वांनाच कपूर कुटुंबात अनेकांचे डोळे असेच आहेत अशी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडपरिवारआलिया भट