‘संजू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारून समीक्षकांसह प्रेक्षकांची वाह वाह लुटणारा रणबीर कपूर आता स्वत:च्या इमेज बिल्डिंगसाठी काम करणार आहे. होय, आत्तापर्यंत रणबीर म्हणजे ‘लव्हरबॉय’ अशीचं इमेज होती. किंबहुना आहे. पण आता रणबीर स्वत:चं त्याच्या या ‘लव्हरबॉय’ इमेजला कंटाळला आहे. मला आता यातून बाहेर पडायचे आहे. या ‘लव्हरबॉय’ इमेजला मी वैतागलो आहे. आता मला काहीतरी नवीन करायचे आहे, असे रणबीर कपूर म्हणाला.एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची ‘लव्हरबॉय’ ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘समशेरा’ सारखे चित्रपट साईन केले आहेत. या आगामी चित्रपटांत रणबीरचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कालपरवा आलेला ‘संजू’ हा चित्रपटही रणबीरच्या इमेज बिल्डिंगचाच प्रयत्न आहे. रणबीरने याबद्दल सांगितले की, ‘संजू’ हा माझ्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट होता. यासाठी सुमारे ८ महिने स्क्रीन टेस्ट झाले़ तासन तास मेकअप, हेअर आणि स्किन लावली जात होती. पण मेकर्स प्रत्येकवेळी असमाधानी दिसायचे. कित्येक महिने हेच सुरु होते.या मुलाखतीत रणबीर आपल्या करिअरवरही बोलला. गेल्या दहा वर्षांत एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली, ती म्हणजे, प्रेक्षकांपेक्षा वरचे कुणीही नाही. समीक्षक बोटावर मोजण्याइतके आहेत. पण एका कलाकाराचे नशीब केवळ आणि केवळ प्रेक्षकचं घडवतो. दहा-बारा समीक्षक त्यांचे मत मांडतात. पण अंतिम निकाल प्रेक्षकचं देतात, असे तो म्हणाला.तुझ्या आयुष्यावर बायोपिक आले तर? असा प्रश्न रणबीरला विचारला गेला. यावर माझ्या आयुष्यावर बायोपिक येऊचं शकत नाही. कारण माझे आयुष्य बोरिंग आहे, असे तो म्हणाला.
रणबीर कपूर म्हणतो, ‘लव्हरबॉय’ इमेजला मी आता कंटाळलोय...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 8:54 AM
‘संजू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारून समीक्षकांसह प्रेक्षकांची वाह वाह लुटणारा रणबीर कपूर आता स्वत:च्या इमेज बिल्डिंगसाठी काम करणार आहे.
ठळक मुद्दे तुझ्या आयुष्यावर बायोपिक आले तर? असा प्रश्न रणबीरला विचारला गेला. यावर माझ्या आयुष्यावर बायोपिक येऊचं शकत नाही. कारण माझे आयुष्य बोरिंग आहे, असे तो म्हणाला.