Join us

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 11:36 AM

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय...

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review:  रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor ) 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. रिलीज होताच हा सिनेमा ट्विटरवर ट्रेंड होतोय. खरं तर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा होती. आता सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षक क्रेझी झाले आहेत. रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय.प्रेक्षकांना चित्रपटाची गाणी आवडली आहे. कथाही दमदार असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. एका युजरने ट्विट करत, श्रद्धा व रणबीरच्या ॲक्टिंगचं कौतुक केलं आहे. रणबीरने शानदार ॲक्टिंग केली आहे आणि श्रद्धानेही त्याला पुरेपूर साथ दिलीये, असं या युजरने म्हटलं आहे. अनेकांनी या सिनेमाला ब्लॉकबस्टर म्हटलं आहे. रणबीर कपूर फायर है बॉस..., अशी कमेंट एका युजरने केली आहे.

ट्विटरवरच्या या प्रतिक्रिया बघता, रणबीर व श्रद्धाचा हा सिनेमा लोकांना आवडल्याचं स्पष्ट दिसतंय. कदाचित 'पठाण'नंतर बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाका करणार, असं चित्र आहे. अर्थात येत्या काही दिवसांत हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.‘तू झूठी मैं मक्कार’ हा सिनेमा लव रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. लव रंजन यांचा याआधीचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटानंतर सुमारे चार वर्षांनंतर लव रंजन ‘तू झूठी मैं मक्कार’सोबत मोठ्या पडद्यावर परतत आहेत.

‘तू झूठी मैं मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून  या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर व श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. याशिवाय डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

टॅग्स :रणबीर कपूरश्रद्धा कपूरबॉलिवूडट्विटर