Join us

Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलरमध्येच इतके किसींग सीन्स...पिक्चर तो अभी बाकी है..., 'तू झुठी मै मक्कार'चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 2:39 PM

Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलर मजेदार आहे. रणबीर व श्रद्धाची हटके स्टाईल, त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सोबत एक सरप्राईजही आहे...

Tu Jhoothi Main Makkaar Trailer: गेलं वर्ष बॉलिवूडसाठी फार काही खास नव्हतं. अनेक बिग बजेट सिनेमे आलेत आणि दणकून आपटलेत. पण नव्या वर्षाची सुरूवात दमदार होणार आहे. शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा येत्या दोन दिवसांत रिलीज होताेय. याशिवाय अनेक नव्या जोड्या या वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) जोडी त्यापैकीच एक. या जोडीचा 'तू झुठी मै मक्कार' हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तूर्तास या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाये आणि या ट्रेलरनं सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.

एकंदर ट्रेलर मजेदार आहे. रणबीर व श्रद्धाची हटके स्टाईल, त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सोबत एक सरप्राईजही आहे. होय, चित्रपटात बोनी कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आत्तापर्यंत पडद्यामागे दिसलेले निर्माते बोनी कपूर या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.   डिंपल कपाडियाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

आजकल रिलेशनशिप में घुसना आसान है, उसमे से निकलना मुश्किल, या रणबीरच्या वाक्याने ट्रेलरची सुरूवात होते. यानंतर श्रद्धा कपूरची एन्ट्री होते आणि मग ट्रेलर खिळवून ठेवतो. रणबीर व श्रद्धाची नवीकोरी जोडी पाहताना मज्जा येते. दोघांचे किसींग सीनही यात दिसतात. ट्रेलरच्या सुरूवातीलाच एक किसींग सीन येतो. मग एक... दोन...असे किसींग सीन्स दिसतात. ट्रेलरमध्येच इतके किसींग सीन्स आहेत तर पिक्चर तो अभी बाकी है दोस्तो...

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघे प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये दोघांचीही केमिस्ट्री अफलातून आहे.  राहुल मोदी आणि लव रंजन यांनी हा चित्रपट लिहिला आहे. याआधी लवने 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' हे चित्रपट आणले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरश्रद्धा कपूरबॉलिवूड