Join us

Video: नवीन बेंटले कारमधून रणबीर कपूरचा पत्नीसह फेरफटका, नंबर प्लेटही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 08:47 IST

रणबीरने पापाराझींची घेतली मजा

बॉलिवूडमधील मोस्ट पॉवरफुल कपल म्हणून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटचं (Alia Bhatt) नाव घेतलं जातं. दोघंही उत्कृष्ट कलाकार तर आहेतच पण 'फॅमिली गोल्स'ही ते देत असतात.  नुकतंच रणबीरने 8 कोटींची बेंटले कार खरेदी केली. काल रणबीर पत्नीसोबत नव्या कोऱ्या कारमधून फेरफटका मारुन आला. रात्री उशिरा एक पार्टी संपल्यानंतर दोघंही पुन्हा बांद्रा येथील घरी जाताना दिसले. नवीन कारमधील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Animal च्या यशानंतर रणबीरने नुकतीच 8 कोटी किंमतीची बेंटले कार (Bentley) खरेदी केली. काही दिवसांपासून रणबीर कार ड्राईव्ह करताना दिसतोय. काल तो पत्नी आलियासोबत दिसला. यावेळी रणबीर स्वत: ड्राईव्ह करत होता तर बाजूच्या सीटवर आलिया बसली होती. रात्री उशिरा पार्टी संपल्यावर दोघंही आपल्या बांद्रा येथील घरी पोहोचले. तेव्हा पापाराझींना बघून रणबीरने चेष्टाही केली.'ये, ये आत बस' असं तो एका कॅमेरामनला म्हणाला. तर आलिया बाजूला बसून मजा पाहत होती. यावेळी त्यांची क्युट लेक राहा मात्र दिसली नाही.  त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होतोय.

नंबर प्लेटही आहे खास

रणबीरची नवी कोरी बेंटले कार तब्बल 8 कोटी किंमतीची आहे. या रॉयल कारमध्ये तो आणखी रॉयल दिसत आहे. त्याच्या कारने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. रणबीरच्या कारवरील नंबरप्लेटकडे लक्ष गेलं तेव्हा तीही खासच होती. 2800 हे आकडे त्यावर आहेत. 28 म्हणजे रणबीरचा वाढदिवसाची तारीख आहे. म्हणूनच ती खास आहे.

रणबीर आणि आलिया  स्क्रीनवरही पुन्हा एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' मध्ये ही जोडी झळकणार आहे. यामध्ये विकी कौशलचीही वर्णी लागली आहे. शिवाय 'ब्रम्हास्त्र 2'ही रांगेत आहे. 

 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटकारबेन्टलेबॉलिवूड