बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. पत्नी आलियाने (Alia Bhat) मुलीला जन्म दिला असून तिचे नाव 'राहा' असे ठेवण्यात आले आहे. राहाच्या जन्मानंतर काहीच दिवसात रणबीर कामावर परतला आहे. रणबीरचा आगामी 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhuthi Mai Makkar) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर गुडगावला पोहोचला. तेथील लाईव्ह कॉन्सर्ट मध्येच रणबीरने असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधले.
काल 'व्हॅलेंटाईन डे' असल्याने या प्रेमाच्या दिनाचे निमित्त साधत रणबीर कपूर आगामी रोमॅंटिक कॉमेडी सिनेमाच्या प्रमोशनसाठी गुडगावमधील एका ग्रॅंड इव्हेंटमध्ये सहभागी झाला. यावेळी स्टेजवरुन रणबीरने पत्नी आलिया आणि लेक राहा साठी खास मेसेज दिला. रणबीर म्हणाला, 'तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा. सर्वात आधी मी माझ्या आयुष्यातील प्रेम पत्नी आलिया आणि माझी सुंदर मुलगी राहा यांना 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा देतो. आय लव्ह यू गर्ल्स अॅंड मिस यू.' रणबीरचा हा स्टेजवरील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
'रणबीर कपूर' आणि 'श्रद्धा कपूर' (Shraddha Kapoor) ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत आहे. 'तू झुठी मै मक्कार' हा रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या ट्रेलरला तर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय रणबीर श्रद्धाची ही फ्रेश जोडी लक्ष वेधून घेत आहे. 'लव्ह रंजन' यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.