Join us

भावाच्या रिलेशनशिपवर असे काही बोलून गेली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 7:49 PM

प्रथमच रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर ही आलिया व रणबीरच्या नात्यावर खुलेपणाने बोलली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जोरात आहे. सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नात आलिया-रणबीर पहिल्यांदा एकत्र दिसले आणि त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली. यानंतर तर हे कथित कपल अनेकदा  एकत्र दिसले. केवळ इतकेच नाही तर आलिया ब-याचदा  रणबीरच्या कुटुंबीयांसोबतही स्पॉट झाली. पुढे पुढे आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे अनेक अप्रत्यक्ष संकेत मिळाले. रणबीरची आई नीतू कपूर आणि पापा ऋषी कपूर हेही दोघांच्या नात्यावर अप्रत्यक्ष बोलताना दिसले.  आता प्रथमच रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर ही आलिया व रणबीरच्या नात्यावर खुलेपणाने बोलली आहे. होय, हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमाला रणबीर व आलियाच्या नात्यावर प्रश्न केला गेला. यावर रिद्धिमा ‘इशारों इशारों में’ बरेच काही बोलली. ‘चर्चा तर सुरू आहे, त्यांनाच विचारा. मी यावर आणखी काय बोलू. माझा भाऊ रिलेशनशिपमध्ये असेल तर मला आनंदचं आहे. मी एक आनंदी बहीण आहे,’ असे रिद्धिमा म्हणाली. भलेही रिद्धिमाने आलिया व रणबीरचे नाते खुलेपणाने मान्य केले नाही. पण आनंदी आहे, या एका शब्दात तिने बरेच काही सांगितले.

 आलिया व रणबीर लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर यांच्या पे्रम बहरले. आता या नात्यावर अधिकृत शिक्का कधी लागतो, तेच तेवढे बघायचेय. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया-रणबीर लीड रोलमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय अमिताभ बच्चन आणि मौनी रायही महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहेत.   

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट