रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लुकमध्ये दिसेल.अलीकडे रणबीर लांब केस आणि दाढी अशा लुकमध्ये दिसला होता. (९०च्या दशकात संजय दत्तचे केस लांब होते. त्याचे ते लुक त्या वेळी भलतेच लोकप्रिय झाले होते. संजय दत्तच्या त्याच लुकमध्ये रणबीर चित्रपटात दिसणार आहे.) याशिवाय, रणबीरने या चित्रपटासाठी वजनही वाढविले आहे. यानंतर दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर रणबीर त्याचे वजन कमी करणार आहे. संजयचा ‘रॉकी’ या बॉलिवूड डेब्यू सिनेमातील संजय दत्तच्या लूकप्रमाणेच रणबीरला दिसायचे आहे. यासाठी रणबीरला बरेच वजन कमी करावे लागणार आहे. ‘रॉकी’ ते ‘खलनायक’ आणि ‘खलनायक’ ते ‘मुन्नाभाई’ अशा सगळ्या चित्रपटांत संजय दत्त वेगवेगळ्या रूपांत दिसला. यानंतर तुरुंगात शिक्षा भोगताना तो आणखी वेगळ्याच रूपात लोकांसमोर आला. हे सगळे टप्पे रणबीर आपल्या अभिनयातून साकारणार आहे. अगदी हुबेहूब संजूबाबा स्टाईलने रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तो मेहनत घेत आहे. आता यात रणबीरला किती यश येते, ते बघू या!
संजूबाबासाठी अशी रूपं बदलणार रणबीर!
By admin | Published: March 22, 2017 1:05 AM