Join us

"त्यांच्या अंगात देवी येते" सनी देओलबद्दल रणदीप हुडानं केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:34 IST

एका कार्यक्रमात रणदीप हुडाने सनी देओलबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Randeep Hooda On Sunny Deol: सनी देओलच्या (sunny deol) आगामी 'जाट' (jatt movie) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सनी देओल अ‍ॅक्शन अंदाजात दिसणार आहे. यातला खलनायक अभिनेता रणदीप हुडा हा सनी देओलपेक्षा खतरनाक दिसतोय. 'जाट' सिनेमाच्या निमित्तानं रणदीप हुडा आणि सनी देओल यांनी एकत्र काम केलं आहे. सध्या दोन्ही अभिनेते हे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यातच एका कार्यक्रमात रणदीप हुडाने सनी देओलबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमात सनी देओल आणि सहकलाकार विनीत कुमार सिंग यांच्यासोबत चित्रपटाचे प्रमोशन करताना रणदीप म्हणाला, "मी सनी देओल यांचा मोठा चाहता आहे. त्यांना पाहूनच मी बॉडी बनवायला सुरुवात केली. मी त्याचे पोस्टर कपाटात लावायचो.  इतकी वर्षे त्यांना पडद्यावर पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते पडद्यावर दिसतात तसे अजिबात नाहीत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल एक गुपित सांगतो. ते खूप दयाळू आणि मृदूभाषी आहेत. पण जेव्हा ते कॅमेऱ्यासमोर येतात, तेव्हा त्यांच्या अंगात देवी येते", असं तो मजेत रणदीप म्हणाला. 

गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित 'जाट'  चित्रपटाची निर्मिती पीपल मीडिया फॅक्टरी आणि मैथ्री मूव्ही मेकर्स यांनी केली आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. रणदीपचा आजवर कधीही न बघितलेला खूँखार अवतार या सिनेमात आहे.   'पुष्पा २' जेव्हा रिलीज झालेला तेव्हा त्यासोबत 'जाट'चा टीझर १२,५०० स्क्रीनवर दाखवण्यात आला. हा ॲक्शन पॅक्ड टीझर पाहिल्यानंतर सर्वांना जाट सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :सनी देओलरणदीप हुडा