Join us

'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा सामंथाच्या 'ऊ बोलेगा...' गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:11 AM

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या 'ऊ बोलेगा...'(o bolega ya oo bolega) गाण्यावरील डान्सला मिळतेय चाहत्यांची पसंती

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा पुष्पा (Pushpa Movie) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटासोबतच यातील गाण्यांना खूप चांगली पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या व्हिडीओवर नेटकरी थिरकताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)वर चित्रीत झालेले सामी सामी (Sami Sami Song) आणि सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)वर चित्रीत झालेले ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा (o bolega ya oo bolega)हे गाणे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान आता या गाण्यांनी रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपालाही भुरळ घातली आहे. रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ने केली आहे. दरम्यान तिने सामी सामी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता ऊ बोलेगा या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

दीपा उर्फ रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर पुष्पा चित्रपटातील सामंथावर चित्रीत झालेले गाणे ऊ बोलेगावर हटके डान्स केला आहे आणि त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, पुष्पा विथ जुगनू. या व्हिडीओत रेश्मासोबत स्वाभिमान मालिकेत पल्लवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी दिसत आहे. या दोघींच्या हटके डान्सला चाहत्यांची पसंती मिळत आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकतेच सौंदर्याला समजते की कार्तिकी दीपाची मुलगी आहे. सौंदर्याला कार्तिकी आपली नात असल्याचे समजल्यावर खूप आनंद होतो. मात्र दीपाला जेव्हा समजते की सौंदर्याला ती कुठे राहते हे कळलं आहे तर ती त्यांच्या सतत संपर्कात येईल आणि हे कार्तिकला आवडणार नाही. त्यामुळे दीपा कार्तिकीला घेऊन पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेते. आता दीपा गावी जाईल की इथेच राहील हे पाहणे कमालीचे ठरेल. 

टॅग्स :रेश्मा शिंदेअल्लू अर्जुनरश्मिका मंदानासमांथा अक्कीनेनी