Join us

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'चा तिसरा भाग लवकरच भेटीला, पोलीस अधिकारी शिवानी रॉयची पहिली झलक आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:15 IST

Mardaani Movie : 'मर्दानी' चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता पुन्हा एकदा राणी मुखर्जी मुंबई क्राइम ब्रँचची पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.

यशराज फिल्म्स(Yashraj Films)च्या 'मर्दानी' (Mardaani Movie) सिनेमाच्या तिसऱ्या भागाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मर्दानी चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता पुन्हा एकदा राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुंबई क्राइम ब्रँचची पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी यशराज फिल्म्सने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

मर्दानी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी महिला-नेतृत्वाची फ्रँचायझी आहे आणि लोकप्रिय पोलीस फ्रेंचायझीच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. मर्दानीचा पहिला भाग २०१४ मध्ये रिलीज झाला होता आणि त्याचा सीक्वल देखील २०१९ मध्ये आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरले होते आणि त्याचा चाहता वर्गही मोठा आहे.

राणी मुखर्जीने मर्दानीमध्ये शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे, जी एक बिनधास्त आणि धाडसी पोलीस अधिकारी आहे. जी नेहमीच न्यायासाठी लढताना दिसते आणि ती मोठ्या धैर्याने न्याय देते. मर्दानी लैंगिक रूढींना तोडते आणि स्त्री पुरुषप्रधान व्यवस्थेत कशाप्रकारे पुढाकार घेऊन नेतृत्व करू शकते आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरीही गरजूंना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते हे दाखवून देते.

वर्कफ्रंटराणी मुखर्जीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे सिनेमात झळकली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत होता. या चित्रपटात अभिनेत्री दोन मुलांच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील राणी मुखर्जीच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. 

टॅग्स :राणी मुखर्जीमर्दानी २