Join us

राणी मुखर्जीने नॅशनल टीव्हीवर केली होती करिना कपूरची पोलखोल, करण जौहरही झाला होता हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 5:04 PM

करणने राणीला असा प्रश्न विचारला की, 'करिनाकडे काय आहे, जे तुझ्याकडे नाही'

 Rani Mukerji Revelation: राणी मुखर्जी( Rani Mukherji)ने आता बऱ्याच दिवसांनंतर इंडस्ट्रीत पुन्हा सक्रिय झाली आहे. लवकरच ती आगामी चित्रपट 'मर्दानी 3' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातला घेऊन राणीचे चाहते उत्सुक आहेत. राणी मुखर्जी ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी जिने कारकिर्दीच्या दुसर्‍या इनिंगमध्ये अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवले आहे. 1996 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या राणीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

हा किस्सा त्या दरम्यानचा आहे जेव्हा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोच्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी आणि करीना कपूर खान या दोघी एकत्र दिसल्या होत्या. शोमध्ये दोघांनी खूप धमाल केली. यासोबतच दोघांची अनेक गुपितेही उघड झाली. दरम्यान, करणने राणीला असा प्रश्न विचारला की, 'करिनाकडे काय आहे, तुझ्याकडे नाही' - या प्रश्नाचे उत्तर राणी मुखर्जीनेही अशा अनोख्या पद्धतीने दिले. मात्र, नंतर जेव्हा करीनाला विचारण्यात आले तेव्हा तिने राणी मुखर्जीची अनेक गुपितेही उघड केली.

कॉफी विथ करण या शोमध्ये करीना कपूर आणि राणी मुखर्जी या दोघी पाहुण्या म्हणून दिसल्या होत्या. दोघांनीही करणसोबत सेटवर खूप धमाल केली.  करणने राणी मुखर्जीला विचारले की ती एक गोष्ट कोणती आहे जी तिच्याकडे आहे, पण करिनाकडे नाही? या प्रश्नावर राणीने काहीही विचार न करता लगेचच शाहिद कपूरला अतिशय बोल्ड अंदाजात सांगितले. राणी मुखर्जीचे उत्तर ऐकून जिथे करीना कपूर खान आश्चर्यचकित झाली, करण जोहरही हैराण होता. 

टॅग्स :राणी मुखर्जीकरिना कपूरकरण जोहर