स्टुडिओ रेकॉर्डिंगनंतर राणू मंडलची आणखीन एक झेप, ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:15 PM2019-08-29T12:15:26+5:302019-08-29T12:15:47+5:30
राणूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतर आता राणूने पहिल्यांदाच स्टेज परफॉर्मन्स केला आहे. तिने तिच्या सुरेल आवाजानं सभागृहातील रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. नुकताच राणूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत राणू भरगच्च सभागृहात गाताना दिसते आहे. व्हिडिओ पाहून कळतं की ती कोणत्यातरी इव्हेंटमध्ये गेली होती. इंस्टाग्रामवर राणूच्या एका फॅन पेजवर हा व्हिडिओ पहायला मिळतो आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे की, राणूने पहिला स्टेज शो केला आहे. जो पश्चिम बंगालमधील नवद्वीपमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.
या व्हिडिओचं वैशिष्ट्यं म्हणजे, या व्हिडिओत स्टेजवर राणूसोबत जो व्यक्ती उभा आहे. या व्यक्तीनेच राणूचा व्हिडिओ बनवला होता आणि एका रात्रीत स्टार बनवलं होतं. राणूला पाहून वाटत नाही की हा तिचा पहिला स्टेज शो आहे. राणू ज्या नजाकतीत गाणं गात होती ते पाहून मंत्रमुग्ध होऊन लोक टाळ्यांचा वर्षाव करत होते. स्टेजवर देखील राणूने हिमेश रेशमियाचं तेरी मेरी कहानी हे गाणं गायलं.
रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत. काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला.
रानू लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.