मुंबई - समय रैनाचा India's Got Latent च्या १२ व्या एपिसोडमध्ये राखी सावंत, आशिष सोलंकी, महीप सिंह, बलराज, समय रैना आणि यशराज जज होते. या एपिसोडला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले. हा शो ऑन एअर होण्यापूर्वी राखीचं सेटवर भांडण झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. राखी सावंतचा वाद महीप सिंहसोबत झाला होता. त्यात अलीकडेच समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट शो चांगलाच वादात सापडला असून रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना याच्यावर पोलीस गुन्हे दाखल झालेत.
मागील काही दिवसांपासून समय रैनाची वेळ खरच खराब आहे असं बोललं तर खोटं ठरणार नाही. रणवीर अलाहाबादियाच्या एका विधानाने हा शो वादात सापडला आहे. युट्यूबवरून शो चे लेटेस्ट एपिसोड हटवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर हा शो बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता इन्स्टाच्या सोशल मीडियावर रिलवर शो संबंधित जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक कंटेस्टेंट स्वत:ला पनवती म्हणतो, तो जिथे जिथे जातो, सर्व काही बंद पडते. मग ती कंपनी असो शाळा असो वा कॉलेज सर्व बंद पडले आहे.
मोनाल कोहली असं या कंटेस्टेंटचं नाव आहे. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटच्या १२ व्या एपिसोडमध्ये मोनाल कोहली कंटेस्टेंट बनून आला होता. त्याने शो मध्ये हॅप्पी ड्रम्प वाजवला होता. मोनाल जॉबसह छंद म्हणून ड्रम वाजवतो. या शोमध्ये भाग घेण्यासाठी त्याने एक फॉर्म भरला होता. त्या फॉर्ममध्ये मोनाल कोहलीने तो पनवती असल्याचं म्हटलं होते. जेव्हा यावरून समयने कंटेस्टेंटला कारण विचारले, तेव्हा त्याने मी जिथे कुठे जातो, ते बंद पडते असं सांगितले.
मी ज्या २ शाळा, कॉलेजला शिक्षणासाठी गेलो मी गेल्यानंतर ते बंद पडले. इतकेच नाही तर मला एका ठिकाणी प्लेसमेंट लागली होती. ती कंपनीही बंद पडली असं मोनालने म्हटलं. त्यावर समय रैनाने आता तू या शोवर आला आहे, हा बंद झाला तर तू बघच..असं म्हटलं. या एपिसोडनंतर सध्या इंडियाज गॉट लेटेंटवर बंद होण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे समय रैनाच्या या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका कंटेस्टेंटला विचारले होते की, तू तुझ्या पालकांना नेहमी सेक्स करताना पाहता बघून आनंद घेशील की त्यांना असं करण्यापासून रोखशील, रणवीरच्या या विधानानं नेटिझन्सने संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर हा वाद चांगलाच पेटला, त्यानंतर रणवीर आणि समय रैना दोघांवर पोलीस गुन्हे दाखल झाले. या वादात रणवीरने व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. मात्र हा शो बंद करावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
मोनाल कोहली काय म्हणाला?
इंडियाज गॉट लेटेंट हा शो वादात असताना मोनाल कोहलीचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो म्हणतो की, घरात तुमचं कुणी ऐकत नाही. मी पूर्ण शो बंद केला तरी घरातले बोलतात, तू मोटार सुरू करायला गेला तर ते बंद करू शकत नाही. बॉटल काढली तर फ्रीज बंद करत नाही असं घरचे सांगतात असं त्याने सांगितले. इंडियाज गॉट लेटेंट शो बंद झाल्यापासून मोनाल कोहली व्हायरल झाला असून अनेकजण त्याच्याकडे कॉलेज बंद कर, ऑफिस बंद कर असे मेसेज येत असल्याचा अनुभव त्याने शेअर केला.