Join us  

'हार्पर बाजार ब्राइड'च्या कव्हर पेजवर रणवीर आणि वाणीचा हॉट लूक

By admin | Published: October 08, 2016 7:07 AM

हार्पर बाजार ब्राइड या प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर रणवीर आणि वाणी हॉट फोटोंसह झळकले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'बेफिक्रे' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा स्टार अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूर चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 'हार्पर बाजार ब्राइड' या प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर रणवीर आणि वाणी हॉट फोटोंसह झळकले आहेत.

या मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटला 'वेन रणवीर मेट वाणी' असं नाव देण्यात आलं आहे. लव्ह थीमवर शूट केलेल्या या फोटोशूटमध्ये वाणी कपूर सेक्सी लूकमध्ये दिसत असून, रणवीरचंही हॉट लूक पाहायला मिळत आहे. फोटोशूटमधली रणवीर आणि वाणीची जोडी सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. 

या फोटोशूटचा एक व्हिडीओही 'हार्पर बाजार ब्राइड' या मॅगझीननं इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केला असून, इन्स्ट्राग्रामवर हा व्हिडीओ सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये रणवीर आणि वाणीचे सेक्सी लूकमधले अनेक फोटो दिसत असून, रणवीर सिंह या फोटोशूटमध्ये दंगामस्ती करताना पाहायला मिळतो आहे.

बेफिक्रेचा ट्रेलर पॅरिसमधल्या आयफेल टॉवरच्या जवळ 10 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. रणवीर आणि वाणीच्या सोशल मीडियावर झळकलेल्या हॉट फोटोंमुळे चित्रपट कधी प्रदर्शित होणार त्याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.