रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे, रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटात ७० कोटींचा आकडा पार केलाय, तो म्हणूनच.ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९.४० कोटींची कमाई केली. दुसºया दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमवला. यानंतर शनिवारी १८.६५ कोटींचा आकडा पार केला आणि काल रविवारी २१.३० कोटींचा बिझनेस करत थेट ७२.४५ कोटींपर्यंत मजल मारली. केवळ चार दिवसांत ७० कोटींची कमाई करणाºया ‘गली बॉय’ने याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा गाठला तर नवल वाटायला नको.
Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 13:49 IST
रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे, रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय.
Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!
ठळक मुद्दे‘गली बॉय’ हा रणवीरचा सलग तिसरा हिट चित्रपट आहे. गतवर्षी त्याचे ‘पद्मावत’ आणि ‘सिम्बा’ असे दोन चित्रपट रिलीज झालेत आणि या दोन्ही चित्रपटाने धुव्वाधार कमाई केली. आता रणवीरचा तिसरा चित्रपट ‘गली बॉय’ हाही सुपरडुपर हिट ठरतोय.