Join us

रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 1:49 PM

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीनचं  दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली.

ठळक मुद्देपरदेशातील कमाईबाबत बोलायचे तर ‘गली बॉय’ने परदेशात एकूण ४२.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीनचं  दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. होय,काल गुरुवारी या चित्रपटाने ४.८० कोटींची कमाई केली आणि याचसोबत ‘गली बॉय’ शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाला.  पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९.४० कोटींची धमाकेदार ओपनिंग केली. यानंतर शुक्रवारी १३.१० कोटी, शनिवारी १८.६५ कोटी, रविवारी २१. ३० कोटी कमावले. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट दिसली. सोमवारी ‘गली बॉय’ने ८.६५ कोटींचा बिझनेस केला. मंगळवारी ८.०५ कोटी आणि बुधवारी ६.०५ कोटींचा गल्ला जमवला. गुरुवारी ४.८० कोटींची कमाई केली. ही एकूण कमाई १०० कोटींच्या घरात आहे.

या दुस-या आठवड्यातही ‘गली बॉय’ला आपल्या कमाईचा वेग असाच कायम ठेवावा लागणार आहे. तरचं चित्रपट १५० कोटींचा टप्पा गाठू शकतो. अर्थात आज अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ प्रदर्शित झालाय आणि हा चित्रपट ‘गली बॉय’ला टक्कर देईल, अशी शक्यता आहे. एकीकडे ‘टोटल धमाल’, ‘गली बॉय’च्या २०० कोटींच्या मार्गात अडचणी निर्माण करेल, दुसरीकडे ‘गली बॉय’ची प्रचंड लोकप्रियता ‘टोटल धमाल’वर भारी पडेल. आता ही टक्कर किती रोमांचक होते, ते बघूच.परदेशातील कमाईबाबत बोलायचे तर ‘गली बॉय’ने परदेशात एकूण ४२.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या चित्रपटाने ३० लाख डॉलरचा टप्पा पार केला तर युएईमध्ये १२ लाख डॉलर, युकेमध्ये ४ लाख ३० हजार डॉलर, आॅस्ट्रेलियात ५ लाख ४२ हजार डॉलर रुपयांची कमाई केली आहे.  

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगआलिया भट