Join us

रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, "तू फक्त २२ वर्षांचा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 6:03 PM

ऑलिम्पिकमधील कामगिरीवर प्रकाश पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंचे कान टोचले.

सध्या पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2024 कडे सर्व जगाचं लक्ष आहे. अनेक भारतीय खेळाडू बाजी लावत मेडलसाठी जीवतोड मेहनत घेत आहेत. Mens singles मध्ये २२ वर्षीय लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) कांस्य पदकाच्या सामन्यात पराभव झाला. लक्ष्य सेन हा Mens singles मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष शटलर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला पण अखेरच्या टप्प्यात त्याचा पराभव झाला. यानंतर अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) पोस्ट शेअर करत लक्ष्यचं कौतुक केलं आहे.

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या पराभवानंतर रणवीर सिंहने त्याचं प्रोत्साहन वाढवलं. त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "काय खेळाडू आहे! किती धैर्य, चपळता, शॉट्स ची रेंज, फोकस, हुशारी सगळंच वाहवाह. ऑलिम्पिकमधील त्याची शानदार खेळी शब्दात मांडता येणारी नाही. अगदी थोडक्या फरकाने त्याचा पराभव झाला. पण तो फक्त २२ वर्षांचा आहे आणि ही तर त्याची सुरुवात आहे." ही स्टोरी शेअर करत रणवीर म्हणतो, 'लढायचा दिवस पुन्हा येईलच, तुझा अभिमान वाटतो स्टारबॉय.'

दुसरीकडे भारतीय बॅडमिंटनपटूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी अतिशय निराशाजनक असल्याचं वक्तव्य कोच प्रकाश पदुकोण यांनी नुकतंच केलं होतं. खेळाडूंनी फेडरेशनकडून सतत मागण्या करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणंही गरजेचं आहे. खेळाडू स्वत: खरंच किती मेहनत घेत आहेत हे त्यांनी स्वत:लाच विचारणं आवश्यक आहे. लक्ष्य सेनही हरल्यानंतर निराश झाला होता.पुढील ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनकडून भारताला अपेक्षा असणार आहेत.

टॅग्स :रणवीर सिंगBadmintonभारतपॅरिस ऑलिम्पिक २०२४बॉलिवूड