Ranveer Kisses Bear Grylls: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारणही खास आहे. तसंही रणवीर जिथे जातो, तिथे काहीतरी क्रेझी गोष्टी घडतातच. मग बेयर ग्रील्सच्या ‘रणवीर वर्सेज वाईल्ड विद बेयर ग्रील्स’ या शोमध्ये गेल्यावर काही घडणार नाही, हे शक्यच नाही. नुकताच या शोचा एपिसोड नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला. या शोमध्ये रणवीर जबरदस्त धमाका करताना दिसला. जंगलात रणवीरचा उत्साह, बेयर ग्रील्ससोबतची त्याची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण एक गोष्ट मात्र प्रेक्षकांना खटकली. मग काय, रणवीर सोशल मीडियावर ट्रोल झाला.
होय, सध्या ‘रणवीर वर्सेज वाईल्ड विद बेयर ग्रील्स’ची एक क्लीप प्रचंड व्हायरल होते आहे. यात नेहमीप्रमाणे रणवीरचा दांडगा उत्साह दिसून येतोय आणि बिचारा बेयर ग्रील्स (Bear Grylls) त्याचा हा दांडगा उत्साह पाहून पार घाबरला आहे.
क्लिपमध्ये रणवीर बेयर ग्रील्सवर दणादण चुंबनाची बरसात करताना दिसतोय. एका ट्विटर युजरने ही क्लिप शेअर केली आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी ही क्लिप आवडली आहे तर काहींनी मात्र यावर नाराजी व्यक्त करत रणवीरला ट्रोल केलं आहे.
‘रणवीरला काय प्रॉब्लेम आहे. बेयर ग्रील्स त्याच्या वागण्यानं किती अनकम्फर्टेबल आहे, हे स्पष्ट दिसतंय,’ अशी कमेंट एकाने केली आहे. ‘हे फारच अपमानास्पद आहे. मला तर डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. ‘हे काय? बेयर गील्स सेक्शुअल असॉल्टची केस करू शकतो,’ अशी कमेंट एकाने केली आहे.
रणवीर झाला भावूक ‘रणवीर वर्सेज वाइल्ड’ या कार्यक्रामाच्या मी फक्त दीपिकासाठी आलो आहे. या शोच्या माध्यमातून मला दीपिकासाठी अतिशय मौल्यवान असणारे फूल सरबिका रामोंडा घ्यायचं आहे, असं रणवीर सांगतो. पण यादरम्यान रणवीरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्राणी, उंत डोंगर, नद्या या सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर रणवीरला थकवा जाणवत होता. त्यानंतर रणवीरमधील हिंमत कमी झाली. रणवीरला अश्रू अनावर झाले. रणवीर भावूक झालेलं पाहून शोचा होस्ट बेयर ग्रील्सनं त्याला प्रोत्साहन दिले.