Join us

प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत '83'ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:07 PM

Ranveer singh film 83: २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. 

ठळक मुद्देयेत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी दिग्दर्शक, निर्मात्यांना ओटीटीचा आधार घ्यावा लागला. यामध्येच काही चित्रपटांच्या टीमने मात्र, चित्रपटगृह सुरु होण्याची वाट पाहिली. या चित्रपटांच्या यादीमध्ये अभिनेता रणवीर सिंगची (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेल्या '83'चादेखील समावेश होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. 'सूर्यवंशी' (sooryavanshi) नंतर '83' ची रिलीज डेट समोर आली आहे.

अभिनेता रणवीर सिंगने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्यात चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. सोबतच त्याने चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे.

'कॉमेडी सर्कस'च्या गंगुबाईने घटवलं २२ किलो वजन; आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

 येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २५ सप्टेंबर रोजी केली. त्यामुळे कलाविश्वात सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आगे. इतकंच नाही तर इतक्या दिवसांपासून ज्या चित्रपटांचं प्रदर्शन खोळंबलं होतं. त्या सगळ्या चित्रपटांच्या रिलीज डेट आता समोर येऊ लागल्या आहेत. यात '83' चाही समावेश आहे.

माझी तुझी रेशीमगाठ: 'या' कारणामुळे श्रेयसने घेतला मालिकेत काम करण्याचा निर्णय

"हीच वेळ आहे...'83' यंदाच्या ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहांमध्ये. हिंदू, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे.#ThisIs83", अशी पोस्ट शेअर करत रणवीरने '83' ची रिलीज डेट सांगितली आहे. त्यामुळे येत्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात अनेक दिग्गज सेलिब्रिटी झळकले आहेत. अभिनेता रणीवर सिंगसह दीपिका पदुकोणदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. 

चित्रपटात आहे ही तगडी स्टारकास्ट

या चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :८३ सिनेमाकपिल देवरणवीर सिंगदीपिका पादुकोणआदिनाथ कोठारेसिनेमा