रणवीर सिंगरोहित शेट्टीच्या आणखी एका सिनेमात झळकणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. बी-टाऊनमधील ही चर्चा अखेर खरी ठरली. ‘सिम्बा’ नंतर रोहित शेट्टीचा आणखी एक सिनेमा रणवीरने साईन केला. या सिनेमाचे नाव काय तर ‘सर्कस’. कालच या सिनेमाची घोषणा झाली. रोहित व रणवीरने निर्माता भूषण कुमारसोबत मजेदार फोटो शेअर करत या सिनेमाची घोषणा केली. ‘सर्कस’ या नावावरून एक अंदाज तुम्हाला आला असेलच की, हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस व वरूण शर्मा दिसणार आहेत. तूर्तास या सिनेमावरून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, कॉपीराईटच्या भीतीने रोहितने या सिनेमाचे नाव बदलले असे मानले जात आहे.
ऐनवेळी बदलले नाव?काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग व रोहित शेट्टी मिळून ‘अंगूर’ नामक सिनेमा बनवणार असल्याची चर्चा होती. हा सिनेमा संजीव कुमारच्या ‘अंगूर’ या सिनेमाचा रिमेक असल्याचा दावाही केला गेला होता. रणवीर यात डबलरोलमध्ये दिसणार, अशीही चर्चा होती. आता मात्र या सिनेमाचे नाव ‘अंगूर’ नाही तर ‘सर्कस’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित शेट्टीने कॉपीराईटच्या वादाला घाबरून ऐनवेळी सिनेमाचे नाव बदलल्याचे कळतेय. रोहितला कोणत्याही वादात अडकायचे नव्हते. त्यामुळे वादापेक्षा चित्रपटाचे नाव बदलणेच त्याने शहाणपणाचे समजले.
पण कॉपीराईटचे उल्लंघन होणारच कसे?
रोहित शेट्टीने आपल्या सिनेमाचे ‘अंगूर’ हे नाव बदलून ‘सर्कस’ असे टायटल ठेवले. पण यावरून एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘अंगूर’ नावाने कॉपीराईटचा वाद कसा उद्भवू शकतो? असा सवाल यानिमित्ताने सोशल मीडियावर विचारला जातोय. कारण ‘अंगूर’ हा संजीव कुमारचा सिनेमाही बिमल रॉय यांच्या ‘दो दुनी चार’चा रिमेक होता, असे मानले जाते. ‘अंगूर’ आणि ‘दो दुनी चार’ हे दोन्ही सिनेमे शेक्सपीअरच्या ‘एरर्स आॅफ कॉमेडी’ या नाटकावर प्रेरित सिनेमे होते. त्यामुळे रोहित शेट्टीने आपल्या सिनेमाचे नाव ‘अंगूर’ ठेवले असते तरी बिघडले नसते, असे काहींचे मत आहे.