Join us

वाढदिवसादिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:12 AM

रणवीर सिंगचा आज वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याचा चर्चित व आगामी चित्रपट ८३चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला.

रणवीर सिंगचा आज वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याचा चर्चित व आगामी चित्रपट ८३चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. यामध्ये दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांच्यासारखा रणवीर सिंग दिसतो आहे. 

८३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेला रणवीर सिंगने आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या चाहत्यांना स्पेशल गिफ्ट दिलं आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवर ८३चा लूक शेअर केला. या लूकमध्ये तो कपिल देव यांच्यासारखा दिसतोय. चाहतेदेखील त्याचा लूक पाहून खूप इम्प्रेस झालं आणि बर्थडे बॉयचे खूप कौतूक झालं.

रणवीरने शेअर केलेल्या या लूकमध्ये त्याच्या डोळ्यात चमक पहायला मिळतेय. कपिल देव यांच्यासारखी स्टाईल सोबतच खूप चांगले एक्सप्रेशननं रणवीरच्या लूकला परफेक्ट बनवलं आहे. हा लूक शेअर करत रणवीरनं लिहिले की, माझ्या खास दिवशी सादर करतोय हरियाणाचा तुफान कपिल देव. 

रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चाहत्यांनी त्याच्या लूकचं खूप कौतूक केलं. जास्त युजर्सने कमेंट केली की पहिल्याच क्षणी हा फोटो कपिल देवचा वाटतोय. काही युजर्सने कमेंट केली की लूक पाहून अंदाज लावू शकतो की हा चित्रपट चांगला असणार आहे.

८३ चित्रपट भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे.

या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे. लग्नानंतर एकत्र त्यांचा हा पहिला चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमादीपिका पादुकोण